Maharashtra Lok Sabha election 2024 : 'मोदींना मत म्हणजे विनाशाला मत', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं. त्यांच्या या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. (Chandrasekhar Bawankule criticized Uddhav Thackeray)
ADVERTISEMENT
विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा रत्नागिरी येथे झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली. त्यांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी उत्तर देत पलटवार केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
"पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत राम राम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा राम राम करणं कधीही चांगलं. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले, पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात."
हेही वाचा >> ...म्हणून मी राज्यसभेची खासदारकी नाकारली -विशाल पाटील
"सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली."
हेही वाचा >> ठाकरेंचा नारायण राणेंवर जोरदार हल्ला, "तुमच्या साईजप्रमाणे एकतरी..."
"कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर देवेंद्र फडणवीसजी आणि नारायण राणे साहेब कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही."
हेही वाचा >> भाजपने का दिलं तिकीट? उज्ज्वल निकमांनीच दिलं उत्तर
"मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही", अशी टीका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
मोदी-शाहांना संविधान बदलायचं; ठाकरे नेमके काय बोलले?
प्रचारसभेत बोलताना ठाकरे म्हणालेले की, "महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर जन्मले आहेत. ते आपले वैभव असून, देशाची शान आहेत. म्हणूनच केंद्रातील लोक महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत म्हणूनच महाराष्ट्र द्वेषापोटी मोदी-शाह संविधान बदलू पाहत आहेत, असे विधान ठाकरेंनी सभेत केले.
ADVERTISEMENT