Devendra Fadnavis Reaction on Sharad Pawar Statement : शिरपूर, धुळे : "पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही विचार करतील", असे विधान शरद पवार यांनी एका मुलाखतीत केले आहे. शरद पवारांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. असे असताना या विधानावर आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रतिक्रिया देऊन शरद पवारांना (Sharad Pawar) डिवचलं आहे. (devendra fadnavis reaction on sharad pawar faction merge in congress dhule sabha nandurbar lok sabha heena gavit candidate)
ADVERTISEMENT
नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर मध्ये विजय संकल्प मेळावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार पलटवार केला. पत्रकारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या पाठिंब्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मराठी माणसाचे ते ठेकेदार नाहीत, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे महाराष्ट्र नाही, आम्ही देखील मराठी आहोत आणि मुंबईतील मराठी माणसाला त्यांनी निर्वासित केलं आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर त्यांनी केला.
हे ही वाचा : 'अडीच कोटी द्या EVM हॅक करतो', ठाकरेंच्या नेत्याला ऑफर; प्रकरण नेमकं काय?
तसेच सर्व प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होती या पवारांच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आपला पक्ष चालवणं पवारांना शक्य नसाव म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला आणि पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा ते काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय आहे. यामुळे त्यात काही नवल नाही. लोकसभा निवडणुकीनंतर पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी बोचरी टीका केली आहे. आणि उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा आम्ही चांगल्या प्रकारे जिंकणार असल्याचा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
शरद पवारांचं विधान काय?
'इंडियन एक्स्प्रेस'ला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवारांनी "पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही विचार करतील", असे विधान केले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "काँग्रेस आणि आमच्यात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) कोणताही फरक दिसत नाही, विचारधारेबाबत. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारधारेतूनच येतो."
हे ही वाचा : बारामती कोणत्या पवारांकडे जाणार? घटलेल्या टक्क्याने वाढवली चिंता
"सहकाऱ्यांशी बोलण्याशिवाय मी आताच काही सांगणार नाही. मी काही बोललं नाही पाहिजे. विचारधारेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आम्ही त्यांच्या जवळ आहोत. रणनीतीबद्दल किंवा पुढील वाटचालीबद्दल कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. मोदींसोबत जुळवून घेणे किंवा त्यांना स्वीकारणे कठीण आहे", असे विधान शरद पवार यांनी केले आहे.
ADVERTISEMENT