MNS BJP Alliance : राज ठाकरेंची एन्ट्री, महायुतीत कुणाची जाणार विकेट?

राहुल गायकवाड

• 05:41 PM • 20 Mar 2024

MNS BJP Alliance : राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीत सामील होणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महायुतीतील समीकरणे बदलणार आहेत.

राज ठाकरे यांनी महायुतीत सामील होण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.

मनसे महायुतीत सामील झाल्यानंतर राजकीय समीकरणे कसे बदलतील?

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनसे महायुतीमध्ये सामील होणार

point

राज ठाकरेंच्या समावेशामुळे जागावाटपाचा तिढा

point

शिंदेंना फटका, भाजपला फायदा

MNS chief Raj Thackeray meets Amit Shah : मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सामील होणार हे निश्चित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आले, तर कुणाला फायदा होईल आणि कुणाला जागांवर पाणी सोडावं लागेल हेच समाजवून घेऊयात. (MNS BJP Alliance Explainer)

हे वाचलं का?

महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी होतील याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. राज ठाकरेंना दक्षिण मुंबईची जागा दिली जाऊ शकते. त्याचबरोबर शिर्डीच्या जागेची देखील चर्चा सुरु आहे. या दोन्ही जागा किंवा यापैकी एक जागा राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला दिली जाऊ शकते.

मनसेचा दक्षिण मुंबईवर दावा

दक्षिण मुंबईमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत. बाळा नांदगावकर हे पहिल्यापासून राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. राज ठाकरेंचे एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडूण आणण्याची तयारी मनसेकडून सुरु आहे.

हेही वाचा >> 'बंडखोरीला मान्यता दिल्यासारखे होईल', सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरे 

दुसरीकडे मनसेला जर महायुतीत एकच जागा देण्याचे ठरल्यास शिर्डीची जागा देखील दिली जाऊ शकते. शिर्डी लोकसभेची जागा ही शेड्युल कास्टसाठी राखीव आहे. तिथून देखील बाळा नांदगावकर यांना उतरवलं जाऊ शकतं. अर्थात यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.

लोकसभेच्या जागांचा गुंता वाढणार

राज ठाकरेंनी साधाराण अर्धा तास अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी संभाव्य युतीबाबत ही चर्चा असल्याचं बोललं जातंय. त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी देखील बाळा नांदगावकर जर खासदार झाले तर मनसैनिकांना आनंद होईल असं देखील म्हणाले. 

फडणवीस देखील वेट अण्ड वॉचच्या भूमिका घेण्यास सांगत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या एन्ट्रीने महायुतीतील जागा वाटपांचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> 'मेला तर पुन्हा बाय इलेक्शन', अजित पवारांची शिवतारेंनी उडवली झोप 

आता राज ठाकरेंच्या एन्ट्रीने कोणाला धक्का बसू शकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज ठाकरेंना ज्या दोन जागा दिल्या जाऊ शकतात त्या दोन्ही जागा या शिवसेनेच्या आहेत. 

दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा जे नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत आले आहेत ते इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिर्डीत देखील शिंदेंचेच विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. त्यामुळे जर राज ठाकरेंना या दोन जागांपैकी कुठली जागा द्यायचं ठरलं तर त्याचा फटका हा शिंदेंना बसण्याची शक्यता आहे. 

अजित पवारांचे समर्थक काम करणार का?

राज ठाकरेंना दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा दिली तर शिंदेंना इतर कुठल्या जागा देणार का असा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे सोबत आल्यास शिंदेंना दोन जागांवर फटका बसू शकतो. 

दुसरीकडे अजित पवार आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या शाब्दिक चकमक सगळ्यांनाच माहित आहेत. त्यामुळे महायुतीत राज ठाकरे आल्यास अजित पवारांचे कार्यकर्ते त्यांचं काम करणार का किंवा मनसैनिक राष्ट्रवादीचं काम करणार का असा प्रश्न आहे. 

मनसेच्या मतांचा फायदा होणार?

असं असलं तरी भाजपला मनसेचा फायदा होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये अनेक मतदारसंघामध्ये मनसेची ताकद आहे. मनसे भाजपसोबत आल्याचा त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यातच ठाकरे नावाचा देखील फायदा हा भाजपला होऊ शकतो.


नाशिक महानगरपालिकेत एकेकाळी मनसेची सत्ता होती तर दुसरीकडे पुण्यात देखील मनसेचा विरोधीपक्ष नेता होता. नाशिक असो की पुणे या दोन्ही मतदारसंघामध्ये मनसेचा मतदार आहे. राज ठाकरेंना एक सीट दिली तरी इतर जागांवर मनसेच्या मतांचा भाजपला फायदा होऊ शकतो. 

त्यातच राज ठाकरे सोबत आल्यास मुंबईतील मराठी मतांमध्ये देखील विभागणी होऊ शकते. शिवसेनेत फुट पडल्याने मराठी मतदार दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यातच मनसेसोबत आल्यास पुन्हा त्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते आणि त्याचा फटका हा उद्धव ठाकरेंना बसू शकतो.

हेही वाचा >> राज ठाकरेंनी घेतली अमित शाहांची भेट; ठाकरे म्हणाले, "शेपूट हलवत..." 

तर एकूण राज ठाकरे सोबत आल्यास त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपचं चारशे पार जाण्याचं मिशन आहे. या मिशनमध्ये ज्यांना सोबत घेता येईल त्यांना सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज ठाकरे सोबत आल्यास काही जागांवर नक्तीच भाजपला फायदा होईल.

त्यातच राज ठाकरेंची हिंदुत्ववादी भूमिका ही भाजपसाठी सोयीची आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील राज ठाकरेंची भाषण महत्त्वाची ठरतील, या सगळ्याचा विचार करता राज ठाकरे सोबत येणं भाजपसाठी फायद्याचं आहे. 

अर्थात राज ठाकरेंनी आता अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते राज्यातील नेत्यांशी चर्चा करतील. त्यात राज ठाकरेंना किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp