Raj Thackeray Movie Will be Coming Soon : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) भव्य गुढीपाडवा मेळावा 9 एप्रिल रोजी शिवाजी पार्कात (Shivaji Park) पार पडला. मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या सर्वात त्यांच्या नजरेतून एक गोष्ट हुकली ती म्हणजे मंचावर असलेला फिल्म कॅमेरा. राज ठाकरे यांच्यावर आधारित लवकरच चित्रपट येणार असल्याच्या चर्चा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुढीपाडव्याचा हा मेळावा चित्रपटासाठी लाइव्ह व्हिज्युअल आणि डायलॉग शूट करण्यासाठी होता असं म्हटलं जात आहे. (IN MNS Raj Thackeray Gudhipadwa Melava Film Camera on Stage Capture real Videos and dialouges For film)
ADVERTISEMENT
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाशी संबंधित असलेल्यांनी तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, लाइट्स आणि ड्रोनचा वापर करून राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे चित्रपटासाठी मह्त्त्वाचे शॉट्स कॅप्चर केले. मंचावर एक शूटींग कॅमेरा देखील होता, ज्याचा वापर मनसे प्रमुखांनी संमेलनाला संबोधित करण्यासाठी केला होता. सिनेमाच्या माध्यमातून राज ठाकरे घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. असे वृत्त इंग्रजी दैनिक 'मिड डे'ने दिले होते. त्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले.
तसंच, काहीदिवसांपूर्वी व्हॅनिटी व्हॅन, जनरेटर आणि शूटिंग लाइट्स घेऊन अनेकजण राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर (शिवतीर्थ) चित्रपटासाठी शॉट्स घेण्यासाठी उभे होते. पाडव्याच्या रॅलीदरम्यान, लोकप्रिय मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील व्यासपीठाजवळ उपस्थित असल्याचे सांगण्यात आले, जिथून राज यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दर्शवला.
पक्षाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रेकॉर्ड केलेले शॉट्स चित्रपटासाठी आहेत. हे बायोपिक नसून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जीवनावर आणि पक्षावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, राज ठाकरे महान मराठा योद्धा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एक किंवा दोन चित्रपट बनवण्यात वैयक्तिकरित्या रस घेत आहेत.
गेल्या वर्षी, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी वीरा देसाई, अंधेरी पश्चिम येथे कार्यालयासह सह्याद्री फिल्म्स एलएलपीची स्थापनाही केली. यापूर्वी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते. यामधून त्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ADVERTISEMENT