Lok Sabha Election 2024 Maharashtra Opinion Poll BJP: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) ही महाराष्ट्रात अत्यंत अटीतटीची असणार आहे. भाजपच्या आक्रमकपणे राजकारणाला विरोध करण्यासाठी त्यांचे विरोधक हे अत्यंत ताकदीने एकत्र आल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजपने शिंदे-अजित पवार यांच्या साथीने महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा मिळविण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तेवढ्याच भाजपला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये शरद पवार हे आघाडीवर आहेत. पण त्यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील याचा अंदाज इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. (india tv cnx maharashtra opinion poll ncp sharad pawar party to win total 3 seats in maharashtra see the full list lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
ओपिनियन पोलचा नेमका अंदाज काय.. बारामतीत काय होणार?
2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फारच मर्यादीत यश मिळालं होतं. 2024 ही निवडणूक शरद पवारांसाठी अधिकच निर्णायक आहे. कारण की, त्यांच्या पक्षात फूट पडल्याने त्यांना नाव आणि चिन्ह हे गमवावं लागलं आहे. त्यामुळे मागील दोन निवडणुकीत जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या त्यापेक्षा कमी जागा या शरद पवारांच्या पक्षाला मिळतील असा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात केवळ तीनच जागांवर पवारांचा पक्ष विजयी होईल असा अंदाज इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे सर्व्हेत असंही म्हटलं आहे की, बारामतीत देखील शरद पवारांच्या पक्षाला पराभवाचा धक्का सहन करावा लागू शकतो.
हे ही वाचा>> Maharashtra Opinion Poll: ठाकरेंची शिवसेना जिंकणार महाराष्ट्रातील 'एवढ्या' जागा, ही आहे संपूर्ण यादी!
मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. मात्र, आता महाविकास आघाडीची ताकद ही पवारांसोबत असणार आहे. ज्याचा त्यांच्या पक्षाला फायदा होऊ शकतो. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी 10 जागा या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. आघाडीत कमी मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने पवारांना नेमक्या मतदारसंघांवर लक्षही केंद्रीत करता येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फुटीचा शरद पवारांच्या पक्षाला कितपत फटका बसणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ओपिनियन पोलनुसार, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाराष्ट्रात 3 जागा जिंकू शकतं असा अंदाज आहे. ज्या मागील निवडणुकींमधील जागांच्या तुलनेत कमी असेल.
हे ही वाचा>> Maharashtra Opinion Poll: BJP जिंकणार महाराष्ट्रातील 'या' जागा?, पाहा संपूर्ण यादी
इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. India TV-CNX च्या ओपिनियन पोलनुसार, यंदाच्या निवणडुकीत राज्यात 48 पैकी 24 जागा या भाजपला मिळतील. तर महाविकास आघाडी देखील महाराष्ट्रात केवळ 13 जागांवर विजय मिळू शकतो. असा अंदाज सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT