Congress announced candidature of Abhay Patil in Akola: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) आज (1 एप्रिल) रात्री उशिरा काँग्रेसने महाराष्ट्रातील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. पण यामुळे महाराष्ट्रातील सगळी राजकीय गणित बदलून गेली आहेत. काँग्रेसने दोन उमेदवारांच्या नावाची एक यादी जाहीर केली. त्यापैकी एक नाव हे तेलंगणातील एका उमेदवाराचं होतं तर दुसरं नाव हे महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचं आहे. (lok sabha election 2024 congress announced the candidature of abhay patil in akola and ended the matter of alliance with vanchit bahujan aghadi prakash ambedkar)
ADVERTISEMENT
काँग्रेस थेट अकोला मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पण यामुळे आता एका भलत्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर करून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा विषयच संपवून टाकला असल्याचं आता दिसतं आहे. कारण याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवत आहेत. अशावेळी काँग्रेसने उमेदवार जाहीर करून वंचित यापुढे मविआचा भाग नसेल हे स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार, वंचितचा विषय संपवला?
अकोला मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून काँग्रेसने वंचितसोबतच्या युतीची बोलणी अक्षरश: बंद केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण असं करून वंचित मविआमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका ही मविआतील इतर पक्षाकडून व्यक्त केली गेली.
हे ही वाचा>> Ajit Pawar : 'ही जागा राष्ट्रवादीची होती, पण...',
त्यामुळेच वंचितने काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेला असतानाही काँग्रेसने अकोल्यात उमेदवार देऊन वंचितसोबतच्या युतीला एक प्रकारे रेड सिग्नल दाखवला आहे. त्यामुळे आता वंचित देखील काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याची शक्यता नाही. मात्र, असं असलं तरी वंचितने आधीच नागपुरातून विकास ठाकरे आणि कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली आहे.
मात्र, आता काँग्रेसने आंबेडकरांविरोधातच उमेदवार दिल्याने कोल्हापूरबाबत वंचित काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण नागपूरमध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेल्याने तिथे काही वंचितला उमेदवार देता येणार नाही. पण तेथील निवडणुकीत वंचित आपल्या मतदारांना नेमकं कोणाच्या बाजूने वळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज जे काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहेत त्यांच्याविरोधात वंचित काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा>> Vijay Shivtare : 'महाविकास आघाडीच पलटूरामांचा मेळावा...,'
दुसरीकडे काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देताना मराठा मतदारांचा देखील विचार केला आहे. अभय पाटील यांना उमेदवारी देताना अकोल्यातील मराठा व्होट बँक आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने यावेळी केलेला दिसतोय. वंचित आणि भाजपमध्ये बहुजन मतांचं विभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा हा इथे काँग्रेसला होऊ शकतो. त्यामुळेच आता प्रकाश आंबेडकरांसोबतच भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांची देखील धाकधूक ही वाढली आहे.
ADVERTISEMENT