Sharad Pawar vs PM Modi: कोल्हापूर: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रातील जाहीर सभांमधून पवार-ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. अशावेळी आता पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. हे प्रत्युत्तर स्वत: शरद पवार यांनीच दिलं आहे. 'महाराष्ट्राच्या, देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं.. तर हा महाराष्ट्र बोलणार नाही.. पण ज्या दिवशी संधी मिळेल त्या वेळेला महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ती आम्हा लोकांची तयारी आहे.' असं शरद पवार हे कोल्हापुरातील सभेत म्हणाले. (lok sabha election 2024 sharad pawar has given a direct challenge to prime minister modi in a public meeting in kolhapur shahu maharaj chhatrapat)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देऊ केली आहे. काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आज (1 मे) कोल्हापुरात जाहीर सभा घेतली. याच सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना थेट चॅलेंज दिलं आहे.
हे ही वाचा>> Lok Sabha 2024: माढ्यात खरी लढाई पवार विरुद्ध फडणवीस?
पाहा कोल्हापूरच्या सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले..
'इथे देशाचे पंतप्रधान येऊन गेले.. अनेक ठिकाणी येऊन गेले. हल्ली महाराष्ट्रात जाण्यासाठी त्यांना दुसरं काही दिसत नाही.. चांगली गोष्ट आहे.. या आम्ही तुमचं स्वागत करतो. इथे आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या..'
'देशाचे पंतप्रधान एखाद्या राज्यात जात असतील तर जनतेला संबोधित करतात. आम्ही लोकांनी एका काळामध्ये पाहिलंय की, पं. जवाहरलाल नेहरू हे राज्यांमध्ये जात असत.. नेहरू लोकांना या देशात उभारणी कशी करणार याबाबत मार्गदर्शन करायचे.'
हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली?
'इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान म्हणून अनेक वेळेल्या राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातील लोकांची गरीबी ही कशी घालवणार यासंबधीची विचार त्या मांडायच्या.. हे काम प्रत्येक पंतप्रधानाने केलं. पण आजचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात.. तेव्हा त्यांना दोन लोकांची आठवण ही प्रकर्षाने होते.'
'एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरं शरद पवार.. यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय स्वस्थ बसता येत नाही. माझं त्यांना एवढंच सांगायचं... मी एवढंच सांगू इच्छितो की, मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात कितीदाही आलात, महाराष्ट्रात कितीदा टीका-टिप्पणी केलीत आणि आणि महाराष्ट्राच्या, देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं.. तर हा महाराष्ट्र बोलणार नाही.. पण ज्या दिवशी संधी मिळेल त्या वेळेला महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ती आम्हा लोकांची तयारी आहे..' असं शरद पवार यावेळी म्हणाले..
ADVERTISEMENT