Sharad Pawar: जळगाव: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा जिंकणार? यावरून संपूर्ण राज्यात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. पण याचबाबत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाला राज्यात नेमक्या किती जागा मिळतील याचा आकडाच शरद पवारांनी सांगितला आहे. (lok sabha election 2024 will sharad pawar number about how many seats congress ncp sharadchandra pawar party will win be true)
ADVERTISEMENT
एकीकडे पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पारचा नारा दिला जात आहे. पण असं असताना शरद पवार यांनी भाजपचा हा दावा फोल असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला एवढ्या जागा मिळणार नाही असं शरद पवार म्हणाले. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला किती जागा मिळतील?, पाहा पवारांनी काय दिलं उत्तर..
'सध्या माझं लक्ष 10 जागांवर आहे.. ज्या आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने लढवतो आहे. एकदा त्या 10 जागांचं काम संपलं.. पुढच्या आठवड्यात संपेल की, त्यानंतर बाहेर जाता येईल. पण ट्रेंड अनुकूल दिसतोय.'
हे ही वाचा>> 'मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय चिंताजनक', पवारांचा PM मोदींना टोमणा
'मागच्या वेळेला 5 वर्षांपूर्वी काँग्रेसला 1 जागा मिळालेली, आम्हाला 5 जागा मिळाल्या होत्या. MIM ला 1 जागा मिळाली होती. यावेळेला माझा असा अंदाज आहे की, काँग्रेसला कमीत कमी 10-12 जागा मिळतील, आम्हाला 8-9 जागा मिळू शकतात. यावेळचं चित्र आणि मागचं चित्र यात जमीन-आस्मानचा फरक आहे.'
'देशाचे पंतप्रधान किती वेळा महाराष्ट्रात येतात.. यापूर्वीचे पंतप्रधानांचा असा अनुभव कधी नव्हता. पण आता पुन्हा-पुन्हा पंतप्रधान येत आहेत. ही त्यांची तिसरी-चौथी वेळ आहे. यातून हे स्पष्ट होतंय की, त्यांना आत्मविश्वास नाही.' असं शरद पवार म्हणाले.
'महाविकास आघाडीला 50 टक्के जागा मिळतील...'
दरम्यान, मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीला राज्यात 50 टक्के जागा मिळतील असंही शरद पवार म्हणाले होते.
हे ही वाचा>> 'मी सत्तेसाठी हापापलेलो नाही...', अजित पवार भडकले
'मागच्या निवडणुकीत आम्हा सगळ्यांना मिळून 6 जागा मिळाल्या होत्या. आम्हाला 5 आणि काँग्रेसला 1 आणि 1 अपक्ष.. आज त्याच्यामध्ये तिप्पट तरी वाढ होईल. मला आश्चर्य वाटणार नाही की, आम्हाला 50 टक्के जागा मिळाल्या तर.. मिळाल्याचं आश्चर्य वाटणार नाही.' असंही शरद पवार म्हणाले होते.
ADVERTISEMENT