Maharashtra Loksabha Election 2024 : महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा थोड्याच वेळात जाहीर करेल. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात निवडणुका कधी सुरू होणार आणि निकाल कधी जाहीर होणार? याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
यावेळच्या महाराष्ट्रातील निवडणुकही रंजक आहे कारण या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकीय गणित खूप बदलले आहे. त्यावेळी शिवसेनाही एक होती, पण आता ती दोन भागात विभागली गेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीही दोन भागात विभागली गेली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 होणार 7 टप्प्यात
-
19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तर ४ जूनला मतमोजणी होईल निकाल लागेल.
-
दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिलला होणार आहे.
-
तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे ला होईल.
-
चौथ्या टप्प्याचं मतदान 13 मे ला होणार.
-
पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे ला होईल.
-
सहाव्या टप्प्याचं मतदान 25 मे ला होणार आहे.
- सातव्या टप्प्याचं मतदान 1 जून ला होणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक, पाहा कोणत्या तारखेला कोणता टप्पा..
ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आजवर लोकसभेसाठी महाराष्ट्रात कधीही न झालेली लढाई पाहायला मिळणार आहे. वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि महाराष्ट्रातील शेवटचा आणि पाचवा टप्पा हा 20 मे रोजी असणार आहे.
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये कोणत्या दिवशी असणार मतदान?
- पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
- दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
- पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
यासोबतच लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल.
निकालाचा दिवस
यानंतर अवघ्या देशाचं लक्ष ज्या तारखकडे लागलेलं असेल ती मतमोजणीची तारीख 4 जून 2024 ही आहे. याच दिवशी चित्र स्पष्ट होईल की, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की नाही. सतराव्या लोकसभेचा कालावधी हा 16 जून 2024 संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे मुख्य आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल हा 4 जून 2024 (मंगळवार) रोजी जाहीर केला जाईल. या दिवशी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल.
ADVERTISEMENT