Manoj Jarange on Devendra fadnavis : गौरव साळी, जालना : मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं आणि मराठवाड्याचा निकाल पाहून मला आश्चर्य वाटलं असे विधान आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी भाजपच्या एका बैठकीत केले होते. फडणवीसांच्या या विधानाचा समाचार आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) घेतला आहे. 'तुम्ही आरक्षण दिलं, मग तुमचे उपकार मराठा समाजाने फेडले आहेत. 106 आमदार मराठा समाजाने निवडून दिले. तसेच तुम्ही आम्हालाच हाणलं, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असे म्हणत जरांगेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. (manoj jarange patil reaction on devendra fadnavis statement maratha reservation maharashtra lok sabha result)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. 'तुम्ही आरक्षण दिलं, तुमचे उपकार मराठा समाजाने फेडले आहे, 106 आमदार मराठा समाजाने निवडून दिले. आता तुम्ही 10 टक्के आरक्षण दिलं, त्यात अनेक अडचणी येत असल्याचं जरांगेनी म्हटले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन गैरसमजात राहू नये' असा सल्ला देखील जरांगे पाटलांनी यावेळी दिला.
हे ही वाचा : Modi Cabinet: महाराष्ट्रातून कोण बनणार मंत्री, नेमकं काय ठरलं?
तुम्ही आम्हालाच हाणलं, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मी साधा पोरगा आहे, तुम्ही तुमचा गैरसमज काढा, नाहीतर तुम्ही पुन्हा तुमचं वाजवून घेणार असं म्हणत जरांगे फडणीस यांच्यावर निशाणा साधला. आणि जनतेसमोर आकडेमोड चालत नाही असं म्हणत आम्हाला आमचं आरक्षण द्या, नाही तर तुम्हाला आम्ही कधी राजकारणात येऊ देणार नाही असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. महायुतीने आमचे हे हाल केले, महाविकास आघाडीने आम्हाला काही तुपाचे डबे दिले नाही असं म्हणत जरांगे यांनी दोन्ही आघाड्यांना खडेबोल सुनावले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मराठा समाजाला दोन्ही वेळेला आपण आरक्षण दिलं. पण मराठवाड्याचा निकाल पाहून मला आश्चर्य वाटलं. कारण आमच्या काळात सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मते गेली. यामध्ये मराठा समाजाबाबत नॅरेटीव्ह तयार केलं गेलं. पण हे टिकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत म्हटलं होतं.
ADVERTISEMENT