Maharashtra VidhanSabha Election: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok sabha Election 2024) मध्ये महाराष्ट्राने महायुतीला मोठा झटका दिला. महायुतीचे 45 हून अधिक खासदार जिंकतील असा विश्वास भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना होता. मात्र, महाराष्ट्रात 48 पैकी केवळ 17 जागाच महायुतीला जिंकता आल्या. हीच महायुतीसाठी आता धोकांची घंटा असल्याचं दिसतं आहे. कारण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाचं गणित आपण लक्षात घेतलं तर आत्ताच्या घडीला निवडणुका झाल्यास महायुती राज्यातील सत्ता गमावू शकते असं चित्र मतांच्या आकडेवारीनुसार दिसतं आहे. (mumbai tak exclusive how many seats will mahayuti and mahavikas aghadi win in maharashtra assembly elections 2024 look at the list)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विधानसभानिहाय जे मतदान झालं त्याचा विचार केल्यास आत्ताच्या घडीला राज्यामध्ये महाविकास आघाडीला 159 जागा, महायुतीला फक्त 127 आणि इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता ही दिसून येते आहे. यामुळे अवघ्या तीन-साडेतीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक दिग्गजांना पराभवाचाही झटका बसू शकतो.
हे ही वाचा>> Modi 3.O: नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान, नेमकं कसं?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीबाबत मतदारांमध्ये स्पष्टपणे नाराजी दिसून आली. त्याची परिणिती म्हणून महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळाला. याचच विधानसभा निवडणुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता ही अधिक आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या मतदानातील आकडेवारीनुसार महाविकास आघाडी ही सध्याच्या घडीला वरचढ ठरत असल्याचं दिसतं आहे.
हे ही वाचा>> 'Modi Ka Parivar' सोशल मीडियावरून हटवा, मोदींचा आदेश
पाहा महाराष्ट्रात विभागानुसार महाविकास आघाडी आणि महायुती किती जागा जिंकू शकतात?
1. विधानसभा निवडणुकीत कोकण विभागात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा जिंकण्याची शक्यता?
2. विधानसभा निवडणुकीत मुंबई विभागात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा जिंकण्याची शक्यता?
3. विधानसभा निवडणुकीत मराठवाडा विभागात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा जिंकण्याची शक्यता?
4. विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र विभागात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा जिंकण्याची शक्यता?
5. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र विभागात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा जिंकण्याची शक्यता?
6. विधानसभा निवडणुकीत विदर्भ विभागात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा जिंकण्याची शक्यता?
ही आकेडवारी लक्षात घेतल्यास राज्यात महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेत येऊ शकतं. तर महायुतीला राज्यातील सत्ता गमवावी लागू शकते. त्यामुळे आता या निवडणुकीपूर्वी युती आणि आघाडी कशा पद्धतीची रणनिती आखते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT