Modi Cabinet 2024 : मोदी-शाहांचा धक्का, 20 मंत्र्यांचा पत्ता कट; नारायण राणे ते स्मृती ईराणी...

मुंबई तक

• 06:38 PM • 09 Jun 2024

PM Modi new cabinet minister list 2024 : विशेष म्हणजे काही खासदार हे लोकसभा निवडून आले असून देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही आहे. तर काही खासदार निवडणूक न लढताही त्यांचा मंत्रिमंडळात समाविष्ट झाले आहे.

 pm narendra modi oath ceremony narayan rane bharati pawar raosaheb danve kapil patil bhagwat karad who are not part of third modi cabinet

आता मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले हे 20 मंत्री कोण आहेत?

follow google news

PM Modi new cabinet minister list 2024 : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.मोदींसह या मंत्रिमंडळात 65 नेते मंत्रिपदाची शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळात जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही खासदार हे लोकसभा निवडून आले असून देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही आहे. तर काही खासदार निवडणूक न लढताही त्यांचा मंत्रिमंडळात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले हे 20 मंत्री कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (pm narendra modi oath ceremony narayan rane bharati pawar raosaheb danve kapil patil bhagwat karad who are not part of third modi cabinet) 

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती ईराणी, राजीव चंद्रशेखर, नारायण राणे, कपिल पाटील  यांच्यासह अनेक नेत्यांकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती. तर अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रिडा मंत्रालय होतं. मात्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. नारायण राणे देखील मोदींच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक देखील जिंकली होती. मात्र तरी देखील त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील या नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आहे. 

हे ही वाचा : पुण्याचा माजी महापौरांची मोदींच्या मंत्रिमंडळात एन्ट्री, मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास

'या' नेत्यांना डच्चू 

स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्हीके सिंह आणि अश्विनी चौबे या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही. तसेच अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आरके सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे आणि भागवत कराड यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश नसेल, अशी माहिती आहे.

मोदींसोबत हे खासदार घेणार मंत्रि‍पदाची शपथ

1) अमित शाह
2) जे.पी. नड्डा
3) राजनाथ सिंह
4) नितीन गडकरी
5) एस. जयशंकर
6) पीयूष गोयल
7) प्रल्हाद जोशी
8) जयंत चौधरी
9) जीतनराम मांझी
10) रामनाथ ठाकूर
11) चिराग पासवान
12) एच.डी. कुमारस्वामी
13) ज्योतिरादित्य शिंदे
14) अर्जून राम मेघवाल
15) प्रतापराव जाधव
16) रक्षा खडसे
17) जितेंद्र सिंह 
18) रामदास आठवले
19) किरेन रिजुजू

हे ही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाकारलं मंत्रिपद, काय बिनसलं? Inside Story

20) राव इंद्रजित सिंह
21) शांतनू ठाकूर
22) मनसुख मांडविया
23) अश्विनी वैष्णव
24) बंडी संजय
25) जी किशन रेड्डी
26) हरदीप सिंह पुरी
27) बी.एल. वर्मा
28) शिवराज सिंह चौहान
29) शोभा करंदलाजे
30) रवनीत सिंह बिट्टू
31) सर्वानंद सोनोवाल
32) अन्नपूर्ण देवी
33) जितिन प्रसाद
34) मनोहर लाल खट्टर
35) हर्ष मल्होत्रा
36) नित्यानंद राय
37) अनुप्रिया पटेल
38) अजय टमटा
39) धर्मेंद्र प्रधान 
40) निर्मला सीतारामन
41) सावित्री ठाकूर
42) राम मोहन नायडू किंजरापू
43) चंद्रशेखर पेम्मासानी
44) मुरलीधर मोहोळ
45) कृष्णपाल गुर्जर 
46) गिरिराज सिंह
47) गजेंद्र सिंह शेखावत
48) श्रीपदा नाईक
49) सी.आर. पाटील
50) चंद्र प्रकाश 
51) पंकज चौधरी
52) सुरेश गोपी

    follow whatsapp