Prakash Ambedkar, Mumbai Tak Chavadi : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर फारसा चालला नाही. प्रकाश आंबेडकरांची नेमकी कुठे गणिते बिघडली? वंचितचा मतदार महाविकास आघाडीच्या पारड्यात गेला आहे का? यासह अनेक प्रश्नांवर वंचितच्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबई तकच्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) दिलखुलास उत्तरे दिली आहेत. या उत्तरांसोबत प्रकाश आंबेडकरांनी काही मोठी विधाने देखील केली आहेत. उद्धव ठाकरेंनी जर युती टिकवली तर महाविकास आघाडीला नक्कीच फायदा होईल असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
मुंबई तकच्या चावडीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीत आम्ही न गेल्याने आम्हाला कुठलाच फटका बसला नाही आहे. याउलट हळुहळू लोकांचा काही नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. तसेच जर दलित आणि मुस्लिम मतदारसंघ महाविकास आघाडीसोबत गेला असेल तर, जुलैच्या पोटनिवडणुकीत कळेल की आमचा तात्पुरता मतदार गेलाय की कायमचा गेला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
हे ही वाचा : Maharashtra MLC Election : 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, ठाकरे-पवारांची विधानसभेपूर्वी 'परीक्षा'?
उद्धव ठाकरे यांनी जर ही युती टिकवली तर महाविकास आघाडीला नक्कीच फायदा होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे यांच्यात लढाई होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंना देखील कमी मते मिळाली नाहीयेत. शिंदेंना मिळालेल्या मतांमध्ये, मुस्लिम, दलित, ख्रिश्चण आणि भटक्यांची मते नाहीत. पण तुलना करायचं झालं तर हिंदु मतांचं प्रमाण शिंदेकडे जास्त असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पण याचा अर्थ असा नाही की उद्धव ठाकरेंपासून हिंदू मते दुरावली आहेत.फक्त मतदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले आहेत. पण ते पुढच्या निवडणुकीत ठाकरेंकडे देखील येऊ शकतात, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
हे ही वाचा : लोखंडी पानाने डोक्याचा चेंदामेंदा, भररस्त्यात प्रेयसीची निर्घृण हत्या; वसई हादरली!
धार्मिक राजकारण आणि संविधान बदलणारे मुद्दे हे आम्हाला बंदिस्त करणारे होते. त्यामुळे आम्ही हे नरेटिव्ह तयार केलं होतं. या मुद्यावर मुस्लिम मतदारांकडून सर्वांत जास्त प्रतिसाद मिळाला. आणि हा मतदार एका बाजुला (मविआकडे) गेला. त्यामुळे इकडे आमची गणिते बिघडल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
ADVERTISEMENT