Pune Accident : 'मंत्रालयाचा सहावा मजला अन् डॉ.अजय तावरेंच्या जीवाला धोका', अंधारेंचा खळबळजनक आरोप

प्रशांत गोमाणे

• 02:31 PM • 29 May 2024

Sushma Andhare on Ajay Taware : अजय तावरे म्हणतात, माझ्याकडे अनेक नावे आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळी त्यांच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घेतला पाहिजे. तर गेल्या 10 वर्षात अजय तावरेंने काय काय बघितलं आहे हे समजून घेतलं पाहिजे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

pune porsche accident news dr ajay taware life threatened ministry sixth floor shivsena ubt sushma andhare big reavelation

ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन करण्यात आले आहे.

follow google news

Sushma Andhare on Ajay Taware : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात आता ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याआधी रक्ताचे नमुन्यांची अदलाबदल केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. या प्रकरणात आता शिवसेना उबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अजय तावरे यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचे सरंक्षण असल्याचा आरोप केला आहे. तसेच अजय तावरे (Ajay Taware) यांच्या जीविताला धोका असल्याचे देखील अंधारे यांनी म्हटले आहे.  (pune porsche accident news dr ajay taware life threatened ministry sixth floor shivsena ubt sushma andhare big reavelation) 

हे वाचलं का?

सुषमा अंधारे या पत्रकारांशी बोलत होत्या. अजय तावरेचे नाव फक्त रक्ताच्या नमुने बदलण्यापर्यंत मर्यादीत नाही. ज्यावेळी अजय तावरे म्हणतात, माझ्याकडे अनेक नावे आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळी त्यांच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घेतला पाहिजे. तर गेल्या 10 वर्षात अजय तावरेंने काय काय बघितलं आहे हे समजून घेतलं पाहिजे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : सुप्रिया सुळे की, सुनेत्रा पवार... सट्टा बाजाराचा अंदाज काय सांगतोय?

तसेच पल्लवी सापळे, अंजय तावरे, अजय चंदनवाले अशी अनेक नावे आहेत. या सगळ्या नावाचा सहाव्या मजल्याशी काय संबंध आहे? अडीच वर्षाचं सरकार पाडण्यात काय संबंध आहे? असा सवाल उपस्थित करत, मी यावर 4 जून नंतर बोलेन अशी भूमिका सुषमा अंधारेंनी घेतली आहे. 

सध्या सगळ्यांच्या नजरा निवडणुकीच्या निकालाकडे आहे. त्यामुळे जर मी आताच या गोष्टी उघड केल्या तर पोलिसांवर ताण येईल. म्हणून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तिथपर्यंत डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते, असे अंधारे म्हणाल्या आहेत. 

    follow whatsapp