नागपूर: नागपुरात एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने एका विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेसोबत झालेल्या जोरदार वादानंतर ही हत्या झाली असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, हत्येनंतर महिलेचा मृतदेह हा एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टाकीमध्ये फेकून दिला होता. आरोपी पोलीस कर्मचारी आणि मृत महिला यांचे अनैतिक संबंध असल्याचं बोललं जात आहे. ही घटना समोर आल्याने संपूर्ण नागपुरात एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश उर्फ नरेंद्र पांडुरंग दाहुले (वय 40 वर्ष) याला शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी व्यक्तीबद्दल फारशी माहिती दिली नाही, फक्त ती व्यक्ती पूर्वी पोलिसात कार्यरत असल्याचे सांगितले.
हे ही वाचा>> 11 November 2024 Gold Rate: आरारारा! सोन्याचे भाव गगनाला भिडले; मुंबई-पुण्यातील दर वाचून अनेकांना फुटला घाम
आरोपी आणि महिला होते वर्गमित्र
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दाहुले आणि मृत महिला त्यांच्या शालेय जीवनात वर्गमित्र होते आणि तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर या वर्षी ऑगस्टमध्ये दोघेही फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. जे लवकरच प्रेमसंबंधात बदलले. दोघेही भविष्याची स्वप्ने पाहू लागले. मात्र, 26 नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये त्यांच्या पुढील आयुष्यावरून जोरदार वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात दाहुले याने आपल्या मैत्रिणीचा गळा दाबून खून केला. पीडित महिला 40 वर्षांची असून विवाहित होती.
आरोपींनी मृतदेह कारमध्ये ठेवला अन्...
महिलेचा मृतदेह लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह गाडीत ठेवून अनेक तास फिरवला आणि नंतर बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेळा हरी परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील सेप्टिक टँकमध्ये मृतदेह फेकून दिला.
हे ही वाचा>> Atul Subhash Case : अनैसर्गिक संबंध ते पैशांची मागणी; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अतुल सुभाषचे आरोप
याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस आरोपींच्या फोन रेकॉर्डपासून ते मृतदेह ज्या ठिकाणी फेकण्यात आला त्या ठिकाणापर्यंत सर्व गोष्टींचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
