Lok sabha Election 2024 : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, 'तेव्हा सत्तेचा बोळा कोंबला असतात तोंडात...'

प्रशांत गोमाणे

04 May 2024 (अपडेटेड: 04 May 2024, 10:27 PM)

Raj Thackeray Critize Udhhav Thackeray : 2014, 2019 च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारने केल्या त्या मला पटल्या नाहीत. त्यामुळेच त्यांचा मी जाहीर विरोध केला. त्या गोष्टी मला आजही पटत नाहीत. त्या गोष्टी स्पष्ट असणे गरजेचे आहे. ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर समर्थनही केलं, असे राज ठाकरे म्हणाले.

raj thackeray critize udhhav thackeray on bjp shiv sena alliance kankavali rally narayan rane lok sabha election 2024

2014, 2019 च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारने केल्या त्या मला पटल्या नाहीत.

follow google news

Raj Thackeray Critize Udhhav Thackeray : 'तुमचं अडीच अडीच वर्षाचं छेंगाड होतं. त्यावेळेला भाजपने अडीच वर्ष मान्य केले असते. तर आज तुम्ही बोलला असतात का?. कारण सत्तेचा बोळा तुमच्या तोंडात कोंबला असतात, मग आता काय बोलणार. ती गोष्ट हिरावून घेतली, म्हणून तुमच्या आग लागली',अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.  (raj thackeray critize udhhav thackeray on bjp shiv sena alliance kankavali rally narayan rane lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

महायुतीचे रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. 2014, 2019 च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारने केल्या त्या मला पटल्या नाहीत. त्यामुळेच त्यांचा मी जाहीर विरोध केला. त्या गोष्टी मला आजही पटत नाहीत. त्या गोष्टी स्पष्ट असणे गरजेचे आहे. ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर समर्थनही केलं, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं.

हे ही वाचा :'मला शिवसेनेला दगाफटका करायचा नव्हता', राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

राज ठाकरे पुढे म्हणाले, जेव्हापासून मला राजकारणाची समज आली तेव्हापासून मी पाहतोय आणि वाचतोय. तेव्हापासून सूरू आहे. 370 कलम रद्द करा. मात्र मोदींनी हे रद्द केलं. हे तुम्हाला मान्य करावच लागेल. 1992 साली बाबरीचा ढाचा गेली ती पाडली गेली. 1992 साली झालेली ती गोष्ट होती. आज राम मंदिराचा पहिला भाग उभा राहिला. रामलल्ला तेथे उभे राहिले. जसं काश्मीरचं झालं तर राम मंदिराचंही झालं. नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे राम मंदीर उभं राहिलं. त्यामुळे कारसेवकांच्या आत्म्याला शांतता मिळाली, असे कौतुक राज ठाकरे यांनी यावेळी केले. 

ठाकरेंनी काल सांगितलं कोकणातले प्रकल्प गुजरातला जात आहेत. वा रे वा 2014 ते 2019 या काळात तुम्ही त्यांच्यासोबत होतात. तेव्हा का विरोध केला नाही. कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणाऱ्या माहिती नाही का? की ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. याचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार,असा हल्लाबोल देखील राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केला. 

    follow whatsapp