Sanjay Raut : ''...तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'', मुंबई Tak चावडीवर राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

08 Apr 2024 (अपडेटेड: 08 Apr 2024, 10:12 PM)

Mumbai Tak Chavadi, Sanjay Raut : अकोला जी त्यांची हक्काची जागा सोडलीच, यासह चार ते पाच जागा आम्ही सगळे सोडायला तयार झालो होते. पण ते समाधानी झाले नाही. आघाडी जागावाटपात मर्यादा असतात, तरी आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं समाधान करण्याचा खूप प्रयत्न केला, असे संजय राऊत यांनी सांगितले.

sanjay raut big statement on eknath shinde will be the on mumbai tak chavadi prakash ambedkar vanchit maha vikas aghadi maharashtra politics

शिंदे माझे मित्र आहे, फार जवळचे त्यांचे माझे संबंध आहेत.

follow google news

Mumbai Tak Chavadi, Sanjay Raut : मुंबई तक चावडीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी अनेक मुद्यावर दिलखूलास उत्तरे दिली होती. भापजने त्यावेळेस जर अडीच-अडीच वर्षाचा करार मान्य केला असता, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. कारण आम्हाला कुणालाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.  (sanjay raut big statement on eknath shinde will be the on mumbai tak chavadi prakash ambedkar vanchit maha vikas aghadi maharashtra politics)

हे वाचलं का?

शिंदेंनी माझ्यावर आरोप करणे आश्चर्यकारक आहे. कारण शिंदे माझे मित्र आहे, त्यांचे आणि माझे फार जवळचे संबंध आहेत. जर भाजपने आमचा अडीच-अडीच वर्षांचा करार मान्य केला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. दुसरं कुणीच झालं नसतं, कारण आम्हाला कुणालाच इच्छा नव्हती. विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला.

हे ही वाचा : शरद पवारांचा PM मोदींना टोला! ''माझं बोट धरून राजकारणात आले, आता बोटाची काळजी...''

वंचित मविआत का आली नाही? 

्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत का आले नाही? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, ''दुदैव आहे की ते आमच्यासोबत नाही आहेत. आम्ही खूप प्रयत्न केले. त्यांनी आमच्यासोबत असायला हवे होतं. देशाचं संविधान वाचवण्यासाठी हुकूमशाही विरूद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, अशी आमची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले. आम्ही त्यांच्यासाठी अकोला जी त्यांची हक्काची जागा सोडलीच, यासह चार ते पाच जागाही आम्ही सगळे सोडायला तयार झालो होतो. पण ते (आंबेडकर) समाधानी झाले नाही. आघाडी जागावाटपात मर्यादा असतात, तरी आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं समाधान करण्याचा खूप प्रयत्न केला, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

हे ही वाचा : भाजप ठरणार बाहुबली! ठाकरे-पवारांना मिळणार 'एवढ्या' जागा

भारतीय जनता पार्टीचं गेल्या 15-20 वर्षातलं राजकारण पाहतोय. ते आपल्या सहकाऱ्यांना संपवून मोठे व्हायचा प्रयत्न करतात. हा त्यांचा इतिहास आहे. मी यांची पाऊलं ओळखत होतो. पक्ष फोडायची आणि आपला विस्तार करायचा. स्वत:च्या विचारावरती विस्तार नाही करायचा. माझा पक्ष मी विस्तार असे नाही.दुसऱ्यांना फोडून मोठं व्हायचं. 

मला तेव्हाही वाटायचं हे आमचा पक्ष फोडणार आहेत. हा त्यांचा अजेंडा आहे. कारण महाराष्ट्रात जोपर्यंत ठाकरे आणि पवार संपत नाही. तोपर्यंत त्यांना मुंबईचा घास गिळता येणार नाही.महाराष्ट्रावरती आक्रमण करता येणार नाही. आम्ही लढवय्ये लोक आहोत. त्यांना लढवय्यांना खतम करायचं आहे. त्यांनी करून दाखवलं, पण तरी आम्ही संपलो नाही, हे त्यांच दु:ख आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. 
 

    follow whatsapp