Raj-Uddhav Meeting : राजकारणात होणार उलथापालथ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? समोर आली मोठी अपडेट

ऋत्विक भालेकर

• 04:18 PM • 15 Dec 2024

Raj Thackeray-Uddhav Thackeray Latest News Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार या विधानसभा निवडणुकीत निवडून आला नाही.

Uddhav Thackeray And Raj Thackeray Meeting

Uddhav Thackeray And Raj Thackeray Meeting

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी लावली शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी

point

रश्मी ठाकरेंनी राज ठाकरेंचं केलं स्वागत

point

राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यात खलबतं?

Raj Thackeray-Uddhav Thackeray Latest News Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार या विधानसभा निवडणुकीत निवडून आला नाही. राज्यात महायुतीनं पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या हाती घेतल्यानं महाविकास आघाडीची कोंडी झालीय. परंतु, विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच दोन्ही ठाकरे कुटुंबियांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती आहे. 
 
राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. रश्मी ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. मात्र, उद्धव आणि राज ठाकरे यांची थेट भेट झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंनी या लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज - उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राज यांच्याकडून पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ambadas Danve "...म्हणून महाविकास आघाडीने सरकारच्या चहापाण्यावर घातला बहिष्कार, अंबादास दानवेंनी स्पष्टच सांगितलं

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती सडकून टीका

"2019 चा निकाल लागला आणि त्यांना समजलं की आमच्याशिवाय त्यांचं सरकार बसू शकत नाही. त्यानंतर त्यांनी लगेच पिळायला सुरुवात केली. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद द्या, नाहीतर आम्ही जातो. उद्धव ठाकरे काँग्रेस-एनसीपीसोबत गेल्यावर सर्व फोटोंवरून सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आधीचं हिंदूहृदयसम्राट ही गोष्टच काढून टाकली. शिवसेनेच्या होर्डिंगवर बाळासाहेबांचा फोटो पण हिंदूहृदयसम्राट लिहिलेलं नसायचं. काही होर्डिंग्जवर उर्दूत लिहिलं होतं की जनाब..", असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला होता.

हे ही वाचा >> Shiv Sena Minister List: शिंदेंनी 'या' नेत्यांना दिली संधी, पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी!

    follow whatsapp