नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून 10 आमदार हे मंत्री होणार आहेत. पैकी अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे उर्वरित 9 मंत्री हे आज (15 डिसेंबर) मंत्रिपदाची शपथ घेतील. अजित पवार यांचे एकूण 40 आमदार हे निवडून आले होते. त्यापैकी 10 आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. (ajit pawar give a chance ministerial berths to these ncp leaders see the list of ncp ministers )
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री घेणार शपथ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी सुरुवातीलाच भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. कारण भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाल होता. अशावेळी त्यांनी सुरुवातीलाच भाजपच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. त्यामुळे मंत्रिमंडळ वाटपात त्यांना तब्बल 10 मंत्रिपदं मिळाल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा>> Shiv Sena Minister List: शिंदेंनी 'या' नेत्यांना दिली संधी, पाहा शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी!
याशिवाय सुरुवातीपासूनच अजित पवारांची केमेस्ट्री ही देवेंद्र फडणवीसांसोबत जुळली आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं हे एक प्रकारे अजित पवारांच्या पथ्यावरच पडल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion LIVE: शपथविधी सोहळा सुरू, महायुतीचे 39 मंत्री घेणार शपथ
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून 10 आमदार हे फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री असणार आहे. त्यापैकी आज 9 जण शपथ घेणार आहेत.
- धनंजय मुंडे
- आदिती तटकरे
- बाबासाहेब पाटील
- दत्तात्रय भरणे
- हसन मुश्रीफ
- नरहरी झिरवाळ
- मकरंद पाटील
- इंद्रनील नाईक
- माणिकराव कोकाटे
राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
ADVERTISEMENT