Shiv Sena UBT Candidates For Lok Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 22 जागा देण्यात आल्या असून, 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंची शिवसेना फायद्यात आहे की, फटका बसला आहे, हे समजून घेणं महत्त्वाचे ठरते. (The Shiv Sena led by Uddhav Thackeray announced nominees for lok sabha elections)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 22 जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी हे स्पष्ट केले आहे. 17 उमेदवार जाहीर केले असून, 5 उमेदवार दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. पण, महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना जास्त फायदा झाला आहे का? हे समजून घेण्यासाठी आधी ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमदेवारांची नावे बघुयात...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार यादी
नरेंद्र खेडेकर - बुलढाणा लोकसभा
संजय देशमुख - यवतमाळ -वाशिम लोकसभा
संजय वाघेरे-पाटील - मावळ लोकसभा
चंद्रहार पाटील - सांगली लोकसभा
नागेश पाटील आष्टीकर - हिंगोली लोकसभा
चंद्रकांत खैरे - औरंगाबाद लोकसभा
ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद लोकसभा
भाऊसाहेब वाघचौरे - शिर्डी लोकसभा
राजाभाऊ वाजे - नाशिक लोकसभा
अनंत गीते - रायगड लोकसभा
विनायक राऊत - सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा
राजन विचारे - ठाणे लोकसभा
संजय दिना पाटील - मुंबई ईशान्य लोकसभा
अरविंद सावंत - मुंबई दक्षिण लोकसभा
अमोल कीर्तिकर - मुंबई वायव्य लोकसभा
अनिल देसाई - मुंबई दक्षिण मध्य
संजय जाधव - परभणी लोकसभा
हेही वाचा >> शिंदेंच्या 5 ते 6 खासदारांचा पत्ता होणार कट?
मुंबईत ठाकरे फायद्यात, काँग्रेसला फटका
जागावाटपामध्ये ठाकरेंची शिवसेना मुंबईत वरचढ ठरली आहे. मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढवावी, अशी नेत्यांची भूमिका होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चार जागांवरील उमेदवार घोषित केले आहे. यात ज्या दोन मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही होते, त्या मतदारसंघातून ठाकरेंनी अनिल देसाई आणि अमोल कीर्तिकर यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मुंबईत जागावाटपात फटका बसला आहे.
कोकणासह सांगली, हिंगोली, शिर्डी ठाकरेंकडे
मुंबई पाठोपाठ कोकणातील दोन्ही मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाले आहेत. रायगड (अनंत गीते ) आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी (विनायक राऊत) या दोन्ही मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार घोषित केले आहेत. त्याचबरोबर शिर्डी, हिंगोली, सांगली या मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही होती. पण, कोल्हापूरची जागा देत सांगली ताब्यात घेतली आहे.
दुसरीकडे हिंगोली आणि शिर्डी हे दोन काँग्रेसचे मतदारसंघ आता ठाकरेंच्या सेनेला मिळाले आहेत. ठाकरेंनी कोल्हापूर, रामटेक, अमरावती हे मतदारसंघ सोडले. पण, महत्त्वाचे मतदारसंघ मिळवण्यात ठाकरेंना यश आले आहे.
हेही वाचा >> 'बारामतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघूनच घेतो..' अजितदादांचा सख्ख्या भावाला थेट इशारा?
काँग्रेसमध्ये नाराजी
ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी आता समोर येऊ लागली आहे. संजय निरुपम हे आधीपासूनच ठाकरेंवर टीका करत आहेत. त्यात आता काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनीही टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करून मित्रपक्ष म्हणून काँग्रेसची ते किती किंमत आणि सन्मान करतात हेच दाखवून दिले आहे. शिवसेनेविरोधात बोललो म्हणून माझ्यावर टीका झाली, पण दिवस लोकांना कळेल की, या आघाडीमुळे फक्त महाराष्ट्रातील काँग्रेस केडरला कसा फटका बसला आहे", असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT