Baramati Lok Sabha : "अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीये", शिंदेंच्या नेत्याने थोपडले दंड

मुंबई तक

11 Mar 2024 (अपडेटेड: 11 Mar 2024, 01:28 PM)

Vijay Shivtare vs Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार, हे स्पष्ट झाले आहे. पण त्यांचे विरोधक एकवटताना दिसत आहेत.

विजय शिवतारे यांनी थेट विरोधात भूमिका घेतल्याने अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे.

विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात टोकाची भूमिका घेतली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक

point

विजय शिवतारे यांचे थेट अजित पवारांना आव्हान

point

महायुतीतील राजकीय वैर चव्हाट्यावर

Vijay Shivtare Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत लोकसभा निवडणुकीचा गुलाल उधळायचा असा निर्धार करत असलेल्या अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) पुरंदरमधून शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दंड थोपटले आहेत. 'खेळ खेळू पैठणीचा' या महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात शिवतारे यांनी अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे", असे म्हणत थेट विरोधात भूमिका घेतली आहे. (It's Time to take revenge, Vijay Shivtare Warned Ajit Pawar)

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे विरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. पण, त्यांच्यासमोर आव्हान मोठं असणार, असं दिसू लागलं आहे. एकीकडे शरद पवारांकडून बेरजेचं राजकारण सुरू असताना आता अजित पवार विरोधक एकवटताना दिसत आहेत. अशातच शिवतारेंच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.

विजय शिवतारे काय म्हणाले ते बघा...

शिवतारे म्हणाले, "सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी मोठ्या मोठ्यांशी पंगा घेतलाय. फक्त लोकांसाठी. एकच आपल्याला संदेश देऊन जातो इथून... कारण आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पाहायचा आहे. आनंद घ्यायचा आहे. लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया ताई आणि सुनेत्रा ताई." 

"बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा काही कुणाचा सातबारा नाहीये. की, सतत ५० वर्ष बारामतीचं खासदार राहायचं. पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे. का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं? पाच पाच वेळा... काय मिळालंय आम्हाला?", असा सवाल शिवतारेंनी यावेळी केला.

बदला घेण्याची वेळ आलीये... शिवतारे नेमके काय बोलले?

लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना शिवतारे म्हणाले, "तुम्हाला आम्हाला विचार करून चालावं लागेल. याच पालखीतळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी... अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा. तू कसा निवडून येतो ते पाहतो. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे." 

हेही वाचा >> "उद्याच माहिती द्या", एसबीआयला सुप्रीम कोर्टाने झापले

"६ लाख ८६ हजार मतदान पवारांचं आहे आणि ५ लाख ८० हजार मतदान पवार विरोधकांचं आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं. ही लढाई आता आरपारची लढायची असा मी आता निर्णय घेतला आहे. तुमचे आशिर्वाद असतील, तर आपल्याला आता कुणाची गुलामी नकोय. किती वर्ष परत परत आम्ही तुम्हाला मतदान करायचं आहे?", असा सवाल करत शिवतारेंनी पवार कुटुंबाविरोधातच रणशिंग फुंकण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा >> "शरद पवारांचा हात ज्याच्यावर पडतो, तो भस्म होतो", सावंतांची ठाकरेंवर अरे तुरे करत टीका  

"याच पालखीतळावरून अपमान केलाय, त्याचा बदला घेतला पाहिजे. याच पालखीतळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे की माझी चूक नाही. माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही. पुरंदरच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. पुढचं रणांगण समोर आहे. दोन पवार विरुद्ध विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे. याला पाड, त्याला पाड, त्याला पाड... आता सगळ्यांनी एकदाच ह्यांना पाडा. जाऊद्या यांचा कार्यक्रम. इतिहास घडू द्या", असे शिवतारे म्हणाले आहेत.

    follow whatsapp