मॉडेल Poonam Pandey चे निधन; समोर आले मृत्यूचे कारण!

रोहिणी ठोंबरे

02 Feb 2024 (अपडेटेड: 02 Feb 2024, 06:47 AM)

Poonam Pandey Death News: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे दु:खद निधन झाले आहे. पूनम गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. यामुळे तिचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती.

actress Model poonam pandey death by cervical Cancer Instagram Viral Post

actress Model poonam pandey death by cervical Cancer Instagram Viral Post

follow google news

Poonam Pandey Death News: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे दु:खद निधन झाले आहे. पूनम गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी (Cervical Cancer) झुंज देत होती. यामुळे तिचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. ही बातमी कळताच चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पूनम रिॲलिटी शो लॉकअपमध्ये दिसली होती. त्यानंतर तिचे फॅनफॉलोईंग प्रचंड वाढले होते.

हे वाचलं का?

‘लॉक अप’मध्ये (Lock Up Show) दिसलेल्या पूनम पांडेच्या मॅनेजरने ही पोस्ट इंस्टावर शेअर (Instagram Post) केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम गमावली आहे. जो कोणी तिच्या संपर्कात आला, ती त्यांना प्रेमाने भेटली. आम्ही या दुःखाच्या काळात गोपनीयतेची विनंती करू आणि त्यांनी आमच्याशी शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना प्रेमाने लक्षात ठेवू.’

वाचा : Baba Siddique : मुंबईत काँग्रेसला दुसरा झटका बसणार! माजी मंत्री अजित पवारांच्या गळाला

या पोस्टवर पूनमचे ​​चाहते भरपूर कमेंट करत आहेत. पूनम आता या जगात नाही यावर त्यांचा विश्वास बसत नाही. कमेंट करत काहीजण तिला श्रद्धांजलीही देत आहेत.

वाचा :

पूनम पांडेने 2020 मध्ये सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचा विवाह फार काळ टिकला नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. पूनमने पती सॅमवर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. 2013 मध्ये आलेल्या नशा या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने कन्नड, भोजपुरी आणि तेलगू भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे.

    follow whatsapp