अमर आणि प्रेमचा खास 'अंदाज' पुन्हा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार, भाईजानने सांगितली तारीख

Salman Khan: 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली होती. आता 31 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

07 Apr 2025 (अपडेटेड: 07 Apr 2025, 02:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सलमान, आमिरसह अनेक दिग्गज कलाकार एका फ्रेममध्ये दिसणार

point

प्रेम आणि अमरचा 'अंदाज' पुन्हा धुमाकूळ घालणार

point

अंदाज अपना अपना चित्रपट कधी रिलीज होणार?

Andaz Apna Apna : बॉलीवूडचे दोन खान पुन्हा एकदा सोबत दिसणार आहेत. दोन्ही खान नव्या नाही, मात्र एका जुन्या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर सोबत दिसणार आहेत. बॉलीवुडमधील सर्वात लोकप्रिय आणि कल्ट क्लासिक कॉमेडी चित्रपटांपैकी एक असलेला ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि ती महिला अधिकारी... प्रकरण नेमकं काय?

25 एप्रिलला होणार रिरीलीज

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली होती. आता 31 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच ही घोषणा केली असून, हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

सलमान, आमिरसह अनेक दिग्गज कलाकार... 

‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात सलमान खान आणि आमिर खान यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं असून, यात रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल आणि शक्ति कपूर या स्टार कलाकारांच्याही खास भूमिका आहेत. 

हे ही वाचा >> मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणावरुन भाजपमध्ये दोन गट, खासदारांनी शहराध्यक्षांना झापलं!

रिलीझ झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला हा चित्रपट नंतर प्रेक्षकांचा आवडता चित्रपट बनला होता. चित्रपटाचे डायलॉग आजही लोकांना पाठ आहेत. 

4K क्लाविटीमध्ये पाहता येणार चित्रपट... 

निर्मात्यांनी सांगितलं की, हा चित्रपट 4K क्वालिटी आणि डॉल्बी 5.1 साउंडसह रीमास्टर्ड स्वरूपात प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन अनुभव मिळेल. “हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून, आम्ही नव्या पिढीला या आनंदाची संधी देऊ इच्छितो, तसंच जुन्या चाहत्यांना नॉस्टॅल्जियाचा आनंद पुन्हा जागवायचा आहे.” असं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp