Annu Kapoor : ''मी हिरो असतो तर प्रियांका चौप्राने...'', किसींग सिनच्या वादावर अन्नू कपूर भडकले!

मुंबई तक

• 09:55 PM • 22 Oct 2024

Annu Kapoor on Priyanka Chopra :बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा काही वर्षापुर्वीच सात खून माफ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात दिग्गज अभिनेते अन्नू कपूर देखील झळकले होते.या सिनेमात प्रियांका चौप्राला अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायचा होता. मात्र हा इंटिमेट सीन देण्यास प्रियांका चौप्राने नकार दिला होता.

किसींग सिनच्या वादावर अन्नू कपूर भडकले!

annu kapoor reaction on kiss controversy with priyanka chopra 7 khoon maaf movie bollywood news

follow google news

बातम्या हायलाइट

point

मी हिरो असतो तर प्रियांकाला किस करण्यात कोणतीही अडचण आली नसती

point

इंडस्ट्रीत हिरोला चुंबन देण्यास कोणत्याच हिरोईनला अडचण नसते

point

म्हणून मला किस करण्यास नकार दिला असावा,

Annu Kapoor on Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा काही वर्षापुर्वीच सात खून माफ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात दिग्गज अभिनेते अन्नू कपूर देखील झळकले होते.या सिनेमात प्रियांका चौप्राला अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायचा होता. मात्र हा इंटिमेट सीन देण्यास प्रियांका चौप्राने नकार दिला होता. त्यावेळेस या प्रकरणावरून मोठा वाद पेटला होता. याच वादावर आता अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (annu kapoor reaction on kiss controversy with priyanka chopra 7 khoon maaf movie bollywood news)

हे वाचलं का?

एएनआय या वृत्तसंस्थेने अन्नू कपूर यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत अन्नू कपूर यांना प्रियांका सोबत झालेल्या वादावरचा एका प्रश्न विचारण्यात आला होता. या वादावर अन्नू कपूर भडकून म्हणाले की, जर मी हिरो असतो तर प्रियांका चोप्राला किस करण्यात कोणतीही अडचण आली नसती. इंडस्ट्रीत हिरोला चुंबन देण्यास कोणत्याच हिरोईनला अडचण नसते. पण दुसऱ्याबाजूला मी आहे. ज्याच्याकडे ना रूप आहे, ना व्यक्तिमत्व, म्हणून मला किस करण्यास नकार दिला असावा,असे अन्नू कपूर यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : अरे बापरे... Ekta Kapoor विरुद्ध Pocso चा गुन्हा, तिची आईही... नेमकं प्रकरण काय?

दरम्यान 2011 साली सात खून माफ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांका चोप्राच्या सात पतींची कहाणी दाखविण्यात आली होती. ज्यामध्ये ती एकामागोमाग प्रत्येक पतीचा खून करते. त्यापैकीच एक अन्नू कपूरही दाखिवण्यात आले होते. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अन्नू कपूर यांनी सांगितले होते की, मी सुंदर दिसत नाही म्हणून प्रियांका चोप्राने माझ्याशी इंटिमेट सीन देण्यास नकार दिला होता. जर मी सुंदर दिसणारा असतो तर प्रियांका चोप्राने नकार दिला नसता.

देशभक्ती हे काही अंत्तर नाही. कोणत्या कार्यक्रमात जायचे असेल तर देशभक्ती अत्तरप्रमाणे शरीराला लावता येत नाही. लग्नात जायचं असेल तर चांगली देशभक्ती लावावी असे नाही. तसेच देशभक्ती आपल्या धमन्यांमधून 24 तास वाहायला हवी, असे देखील अन्नू कपूर म्हणाले आहेत. 

    follow whatsapp