कुवेतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं आहे. पंतप्रधान मोदींना जगभरातील वेगवेगळ्या देशांनी दिलेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. हा पुरस्कार राष्ट्रप्रमुख आणि परदेशी प्रमुखांना आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचं प्रतीक म्हणून दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांना देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Sharad Pawar Call Devendra Fadnavis : शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोेलताना म्हणाले...
पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर गेले होते. PM मोदी हे 43 वर्षांत आखाती देशांना भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. कुवेतला भेट देणाऱ्या शेवटच्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्यांनी 1981 मध्ये कुवेतला भेट दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केलं की, 'कुवेतचे महामहिम शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्यासोबत आम्ही फार्मासिटिकल्स, आयटी, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि कुवेतमध्ये घनिष्ठ संबंध असून, मला आशा आहे की आमची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल."
हे ही वाचा >>Kalyan Dombivali : कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीचा विनयभंग केल्यानंतर जाब विचारायला गेलेल्या...
भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 10.47 अब्ज किमतीच्या द्विपक्षीय व्यापारासह आखाती देश भारताच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक झाले आहे. कुवेत हा भारताचा सहावा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे. देशाच्या 3 टक्के ऊर्जेशी संबंधीत गरजा कुवेत भागवतो. कुवेतला भारतातून होणारी निर्यात यंदा पहिल्यांदाच 2 अब्ववर पोहोचली. कुवेत गुंतवणूक प्राधिकरणाने भारतात केलेली गुंतवणूक 10 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त झाली आहे.
ADVERTISEMENT