Sidhu Moosewala Brother Born : पंजाबमधील प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याची 2022 मध्ये मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आपल्याला एकुलत्या एक मुलाला गमावल्यानंतर सिद्धूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता त्याच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाची लाट आली आहे. दिवंगत सिद्धूच्या आईने IVF च्या माध्यमातून मुलाला जन्म दिला आहे.
ADVERTISEMENT
नुकताच सिद्धूच्या वडिलांनी हा फोटो शेअर केला जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहितीनुसार, सिद्धू मूसेवालाची कोट्यवधींची संपत्ती आहे, ज्याचा नवीन वारसदार मूसेवाला कुटुंबात जन्माला आला आहे. जन्माला येताच हा लहान चिमुकला कोट्यवधींचा मालक झाला असल्याचं म्हटलं जात आहे.
जन्मताच लहान भाऊ दिवंगत सिद्धूच्या संपत्तीचा मालक?
अलिकडेच, मूसेवाला कुटुंबात जन्माला आलेल्या छोट्या पाहुण्यामुळे दिवंगत सिद्धूच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद आला. वयाच्या 58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने मुलाला जन्म दिला आहे. सिद्धू मूसेवालाचा हा धाकटा भाऊ जन्मताच करोडपती झाला आहे, कारण तो या संपत्तीचा वारस असेल. गायकीच्या जोरावर आपलं नाव मोठं करत एक वेगळं स्थान निर्माण करणारा सिद्धू मूसेवाला लक्झरी लाइफ जगला आणि त्याची संपत्ती करोडो रूपयांमध्ये आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला होता संपत्तीचा खुलासा
सिद्धू मूसेवालाने अल्पावधीतच देशामध्ये नाव कमावले होते आणि यासोबतच त्याने आपल्या गायनाच्या जोरावर खूप कमाईही केली होती. त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनही लावता येतो की त्याने 2022 साली काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर मानसामधून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्या एकूण संपत्तीचा तपशील दिला होता. प्रतिज्ञापत्रानुसार, सिद्धू मूसेवालाचे नेटवर्थ 7 कोटींहून अधिक होते.
तसंच इतर अनेक वेबसाइट्सनुसार, सिद्धूची अंदाजे एकूण संपत्ती 30 कोटी रुपये आहे, जी त्याच्या गायनाची फी आणि YouTube द्वारे कमाईवर आधारित आहे.
बँकेत 5 कोटींहून अधिक ठेवी
निवडणूक आयोगाला 2022 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सिद्धू मूसेवालाच्या सुमारे 8 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीपैकी, त्यांच्याकडे 5 लाख रुपये रोख आणि विविध बँकांमध्ये 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी होत्या. त्याने शेअर्स, डिबेंचर्स आणि बाँडमध्ये सुमारे एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. याशिवाय 17 लाख रुपये बचत योजनांमध्ये गुंतवले होते.
सिद्धूच्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन
सिद्धू मूसेवालाच्या अल्बम सॉन्ग्समध्ये आलिशान गाड्या दिसत असे. खऱ्या आयुष्यातही त्याला महागड्या गाड्यांचा शौक होता. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याने त्याच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनर आणि जीप असल्याचे सांगितले होते. याशिवाय त्याच्याकडे अनेक महागड्या कारही होत्या. अनेकदा सिद्धू रेंज रोव्हरमधूनही जाताना दिसत असे.
ADVERTISEMENT