Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: ‘सिंघम अगेन’ की ‘भुल भुलैया ३’ बॉक्स ऑफिसवर कोण वरचढ? जाणून घ्या कलेक्शन

रोहिणी ठोंबरे

• 04:16 PM • 03 Nov 2024

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection : यंदाच्या दिवाळीत बॉलिवूडमध्येही मोठा धमाका सुरू आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणाऱ्या भूल भुलैया आणि सिंघमचे आता नवीन सिक्वल आले आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 ची पहिल्या दिवशी कमाई किती?

point

भूल भुलैया 3 कार्तिक आर्यनसाठी ठरला गेम चेंजर?

point

'सिंघम अगेन'ची पहिल्या दिवशी कमाई किती? 

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection : यंदाच्या दिवाळीत बॉलिवूडमध्येही मोठा धमाका सुरू आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणाऱ्या भूल भुलैया आणि सिंघमचे आता नवीन सिक्वल आले आहेत. 1 नोव्हेंबर रोजी भूल भुलैया 3 आणि सिंघम अगेन हे दोन सिनेमा चित्रपटगृहात झळकले. प्रेक्षकांकडून चित्रपटांना कसाही प्रतिसाद मिळाला असला तरी दोन्ही चित्रपटांना चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आता या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोणते वादळ निर्माण केले? तसेच पहिल्या दिवसाची कमाई किती झाली? आणि कोणत्या चित्रपटाला ग्रँड ओपनिंग करता आली? हे जाणून घेऊया. (Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 How much did it earn at the box office know it in detail)

हे वाचलं का?

भूल भुलैया 3 कार्तिक आर्यनसाठी ठरला गेम चेंजर?

सर्वात आधी भूल भुलैया 3 बद्दल बोलूया. कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. सुरुवातीच्या आकडेवारीवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाने 35.50 कोटींची ओपनिंग केली आहे. यासह, हा कार्तिकच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. अभिनेत्याच्या भूल भुलैया 2 ने पहिल्या दिवशी 14.11 कोटींची कमाई केली होती.

हेही वाचा : Govt Job : 'बँक ऑफ बडोदा'मध्ये नोकरीची संधी! महिना एवढा मिळणार पगार 

 

या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. रिपोर्टनुसार, मॉर्निंग शोमध्ये चित्रपटाची ऑक्यूपेंसी 50 टक्के होती, जी रात्री 84 टक्के झाली.

'सिंघम अगेन'ची पहिल्या दिवशी कमाई किती? 

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपट सिंघमबद्दल सांगायचे तर, अजय देवगणसह रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, करीना कपूर, अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार यात सामील आहेत. या चित्रपटात सलमान खानचाही एक कॅमिओ आहे. चित्रपट सिक्वलची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

हेही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं 'दिवाळी गिफ्ट'! उपमुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत केली मोठी घोषणा

रिपोर्टनुसार सिंघम अगेनने पहिल्याच दिवशी भूल भुलैया 3 ला मागे टाकले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 43.50 कोटींची ग्रँड ओपनिंग केली आहे. यासोबतच अजय देवगणला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंगचा चित्रपट मिळाला आहे. यापूर्वी सिंघम रिटर्न्सने 2014 मध्ये पहिल्या दिवशी 32.09 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला. मात्र, असे असूनही सिंघम अगेनला स्त्री 2 चा विक्रम मोडता आला नाही. हा चित्रपट 2024 चा सर्वात मोठा ओपनर बनला नाही. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची 65.35 टक्के ऑक्यूपेंसी आहे.

आता रोहित शेट्टीच्या पुढच्या कॉप युनिव्हर्स मिशन चुलबुल सिंघमवर चाहत्यांच्या नजरा आहेत. त्यामुळे हा आणखी मोठा चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे. कारण रोहित शेट्टीने दबंग आणि सिंघम फ्रँचायझी मर्ज (विलीन) करण्याची योजना आखली आहे.

    follow whatsapp