Nana Patekar on Underworld : अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या साधेपणामुळे, समाजिक कामांमुळे चर्चेत असतात. मात्र अनेकदा त्यांचा रागही चर्चेचं कारण टरला आहे. काही दिवसांपूर्वीच सेल्फी घेण्यासाठी जवळ आलेल्या एका चाहत्याला त्यांनी फटका मारल्याचं दिसलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र, यानंतर नानांनी आपली चूक असून, असा फटका मारायला नको होता असं म्हणत चूक कबूल केली होती. मात्र, नाना पाटेकर यांनी अशा प्रकारे संताप व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशाच वेगवेगळ्या घटनांवर बोलताना नाना पाटेकर यांनी आपल्या संतप्त स्वभावाबद्द्ल सगळं सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, मी अभिनेता नसतो तर कदाचित अंडरवर्ल्डमध्ये दिसलो असता.
ADVERTISEMENT
नाना पाटेकर म्हणाले, माझा राग खूप वाईट आहे. पण उगाच कोणत्याही गोष्टींवर मी रागावत नाही. मात्र कुणी आपलं काम नीट करत नसेल, तर मला राग येतो. सिद्धार्थ कानन यांना दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी खुलेपणानं आपल्या स्वभावातील गुणदोष सांगितले.
हे ही वाचा >> Manoj Jarange Beed : "तुमच्या आज्याची, बापांची चालत होती, पण आता...", सरपंचाच्या हत्येनंतर जरांगेंचा कुणाला इशारा?
नाना म्हणाले, राग येतोच ना यार... आता जर तुझं आणि माझं नातं फक्त सिनेमारपुरतं असलेल, पण तुमच्याबद्दल जाणून घेण्याची माझी इच्छा नसते. तुला 100 टक्के तिथे असणं गरजेचं आहे ना, 100 टक्के जर तु तिथे दिलं तरच चित्रपट चांगला होईल नाही. त्यामुळे तू पूर्ण तिथे असला पाहिजे. तुला नाव पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, तुला वाटतं सर्वांनी तुझ्यासोबत फोटो घतले पाहिजे, तर हे सगळं फुकट नाही मिळणार.
हे ही वाचा >> Jalna Firing : कारमधून आलेल्या चौघांनी गोळीबार केला, पळून जाताना ट्रक चालकाच्या कमरेला... जालन्यात थरारक घटना
नाना पुढे म्हणाले की, जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा लोक घाबरायचे. माझा स्वभाव प्रचंड रागीट आहे. मी ऐकायचो नाही आणि फार कमी बोलायचो. तेव्हा मी खूपच रागीट होतो, पण आता नाही. तरी आजही एखादी गोष्ट मर्यादेपलीकडे गेली, तर मी हात उचलतो. पण आधी मी फारच रागीट होतो, म्हणजे जर मी अभिनेता नसतो, तर अंडरवर्ल्डमध्ये असतो. मी गंमत करत नाहीये. हे खरं आहे. कॅमेरा मिळाल्यामुळे मी अभिनेता झालो. हे राग काढण्याचं साधन आहे, लोकांकडे काय साधन आहे? ते त्यांचा राग कसा काढतील? त्यामुळेच दंगल झाली तर साधून घेतात. गरीब माणूसही दगड उचलून मारू लागतो असं म्हणत नाना पाटेकर यांनी आपल्या स्वभावाबद्दल स्पष्टपणे सांगितलं.
ADVERTISEMENT