Bigg Boss Marathi 5 Contestant : बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मात्र, शोच्या फिनालेला फक्त 4 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत प्रेक्षकांचे मनोरंजन सुरू ठेवण्यासाठी निर्मात्यांनी बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन आणला आहे, जो बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे. (bigg boss marathi season 5 nikki tamboli angry on varsha usgaonkar beacause of makeup)
ADVERTISEMENT
रविवारी, 28 जुलैपासून या 'रिअॅलिटी शो'ला सुरूवात झाली. शोच्या प्रीमियरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे मराठी बिग बॉस असले तरी त्यात काही ओळखीचे चेहरेही दिसत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री निक्की तांबोळी बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाली आहे.
हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या जागेवर भाजपचा दावा, मावळमध्ये नवा तिढा
बिग बॉस हिंदी सीझन 14 च्या टॉप 3 मधील स्पर्धक मराठमोळ्या निक्की तांबोळीने रितेश देशमुखच्या बिग बॉस मराठीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचे निक्कीचे स्वप्न आहे.
निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. निक्की ही बिग बॉस हिंदीच्या 14 व्या सिझनमध्येही दिसली होती. त्यानंतर ती अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही झळकली होती. तसेच तिचा कंचना-3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
हेही वाचा : Raj Thackeray : "शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये", ठाकरेंचा टोला
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये निक्की जेष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यावर मेकवरून भडकताना दिसत आहे. आता निक्की हिंदीनंतर मराठी बिग बॉस कशी गाजवतेय? हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.
हेही वाचा : Yashashree Shinde Case : दाऊद शेख आणि यशश्रीमध्ये पाच वर्षापूर्वी काय झालं होतं?
रितेश देशमुखमुळे 'बिग बॉस मराठी 5' आणखी ग्रँड होणार
काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता रितेश स्पर्धकांची शाळा कशी घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे आता 100 दिवस बिग बॉसच्या घरात काय काय होणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच रितेश या सगळ्यांची शाळा घेतल्यानंतर स्पर्धकांचा खेळ कसा होणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
ADVERTISEMENT