Mazi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजनेचा जन्मच दिघे साहेबांमुळे', प्रविण तरडेंचं मोठं विधान!

मुंबई तक

22 Jul 2024 (अपडेटेड: 22 Jul 2024, 10:58 PM)

Aanand Dighe anad Mazi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण या योजनेचा जन्म हा आनंद दिघेंमुळे झाला आहे असा दावा धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी केलं आहे.

'लाडकी बहीण योजनेचा जन्मच दिघे साहेबांमुळे'

'लाडकी बहीण योजनेचा जन्मच दिघे साहेबांमुळे'

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचा जन्म दिघे साहेबांमुळे, तरडेंचा दावा

point

धर्मवीर 2 ची टीम मुंबई Tak च्या चावडीवर

point

पाहा प्रविण तरडे काय म्हणाले लाडकी बहीण योजनेबाबत

Dharmaveer Director Pravin Tarde on Mazi Ladki Bahin Yojana: मुंबई: माझी लाडकी बहीण या योजनेची राज्यभरात सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या योजनेवरून सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशातच आता धर्मवीर आनंद दिघे या सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण तरडेंनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, लाडकी बहीण या योजनेचा जन्मच दिघे साहेबांमुळे झाला आहे. (mazi ladki bahin yojana was born because of anand dighe saheb dharmaveer movie director pravin tardes big statement mumbai tak chavadi)

हे वाचलं का?

धर्मवीर - 2 हा सिनेमा 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच निमित्ताने या सिनेमाची संपूर्ण टीम आज (22 जुलै) ही मुंबई Tak च्या चावडीवर आली होती. त्याचवेळी बोलताना प्रविण तरडे यांनी असा दावा केली लाडकी बहीण योजनेचा जन्मच हा आनंद दिघे साहेबांमुळे झाला.

हे ही वाचा>> Majhi Ladki Bahin Yojana: अर्ज भरलेल्या महिलांसाठी मोठी बातमी, सरकारचा 'तो' निर्णय अन्...

आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतूनच CM शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याचं प्रविण तरडे यावेळी म्हणाले.  'त्यावेळेस साहेब (CM शिंदे) जे मंत्रिपद असेल किंवा होतं. त्यापुढे जाऊन आज त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.' असं तरडे यावेळी म्हणाले. 

लाडकी बहीण योजनेबाबत नेमकं काय म्हणाले प्रविण तरडे 

'धर्मवीर - 1 मध्ये आम्ही बलात्काराचा सीन दाखवला.. एक बलात्कारी निर्दोष सुटला. आता तर दिघे साहेब आपल्यात नाहीए. ते जर जिवंत असते तर मारलंय असं नसतं दाखवलं. पण झालंय असं.. प्रत्येक बाईने जीव ओवाळून टाकला त्या सीनवर. इथे एवढ्या मुली उपस्थित आहेत. त्यांना असा राजकारणी आवडेल. न्यायालय पुराव्यांवर चालतं. तिथे पुरावे सादर झाले नाही.. मुलीवर बलात्कार झालाय, मुलगी मेलीय. आणि हा उजळ माथ्याने फिरतोय. कोणी तरी राजकारणी पाहिजे ना असा तू ये बाहेर...' 

'अशी एक बाई दाखवा ज्यांना तो सीन आवडला नाही. सत्या आहे. असा राजकारणी लोकांना हवा आहे.' 

हे ही वाचा>> Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF फॉर्म करा डाऊनलोड!

'आता ती लाडकी बहीण योजना.. याचा जन्मच मुळात या सिनेमातील त्या रक्षाबंधनाच्या सीनमध्ये आहे. दिघे साहेब बोलायचे नेहमी.. ते शिंदे साहेबांच्या बोलण्यात आलं होतं. असे राजकारणी हवेत..'

'लाडकी बहीण जी योजना आहे तिचा जन्मच मुळात दिघे साहेबांकडून जी शिकवण मिळाली आहे.. की, बाईसाठी वाट्टेल ते.. अडचणीत असलेल्या बाईला कायदा तोडून मदत करा.' 

'लाडकी बहीण योजनेचा जन्म हा मूळ दिघे साहेबांच्याच याच्यातून आहे. फक्त त्यावेळेस साहेब (CM शिंदे) जे मंत्रिपद असेल किंवा होतं. त्यापुढे जाऊन आज त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.' असं म्हणत प्रविण तरडे यांनी दावा केली आज सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही आनंद दिघेंमुळे झाली आहे.  

    follow whatsapp