Suraj Chavan won Bigg Boss Trophy Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनवर प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने (Suraj Chavan Bigg Boss Winer) नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गायक अभिजीत सावंत (Abhijit Sawant) हा फर्स्ट रनरअप ठरला आहे. तर निक्की तांबोळी ही सेकंड रनरअप आणि धनंजय पवार थर्ड रनरअप ठरला आहे. (suraj chavan win bigg boss marathi season 5 trophy abhijeet sawant 1st runner up)
ADVERTISEMENT
खरं तर निक्की महाचक्रव्युहमध्ये फसून घराबाहेर पडल्यानंतर अभिजीत सांवत आणि सूरज चव्हाण टॉप 2 मध्ये पोहोचले होते. त्यामुळे या दोघांमधून एक सदस्य विजेता ठरणार होता. यावेेळी रितेश भाऊंनी दोघांचे हातात हात धरून निकाल सुनावला. यामध्ये सूरज चव्हाण हा विजेता ठरल्याचे रितेश भाऊंनी जाहीर केले होते. त्यामुळे सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला होता.
हे ही वाचा : Mumbai Local : बाईईई हा काय प्रकार? भरगच्च गर्दीत लोकलमध्ये महिला खेळल्या गरबा; Video व्हायरल
दरम्यान टॉप थ्रीमध्ये सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी पोहोचली होती. मात्र फिनालेच्या महाचक्रव्युहमध्ये निक्की तांबोळी फसली होती आणि घराबाहेर पडली होती. त्याच झालं असं की बिग बॉस मराठीच्या घरातलं हे शेवटचं एलिमिनेशन होतं. या एलिमिनेशनसाठी बिग बॉसने फायनलसाठी महाचक्रव्युह आणलं होतं. या चक्रव्युहमध्ये अभिजीत, सूरज आणि निक्की या तीनही सदस्यांना तीन खुर्च्यावर बसवण्यात आलं होतं. या तीनही खुर्च्या फिरणार आहेत. आणि जो सदस्य दरवाजा समोर येईल तो घराबाहेर पडणार होता. त्यानुसार निक्की समोरील दरवाजा उघडला होता. त्यामुळे निक्की तांबोळी घराबाहेर पडली आहे. त्यामुळे अभिजीत, सूरज हे दोन सदस्य टॉप 2 मध्ये पोहोचले होते.
किती प्राईज मनी मिळणार?
बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या विजेत्यासाठी 25 लाख रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं, पण घरातील सदस्यांनी वेगवेगळ्या टास्कमध्ये ही रक्कम जिंकावी लागणार होती. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी चक्रव्यूह टास्कमध्ये 25 लाख रुपयांपैकी 8.6 लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर पहिल्या तिकीट टू फिनालेच्या टास्कनंतर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ झाली. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांची किंमत ठरवायची होती. जो सदस्य टास्क जिंकेल त्याची किंमत बक्षिसाच्या रकमेत वाढवण्यात येणार होती. सूरजने हा टास्क जिंकल्यावर त्याची किंमत सहा लाख रुपये बक्षिसाच्या रकमेत जमा झाल्याने बिग बॉस मराठी विजेत्याच्या बक्षिसाठी रक्कम आता 14.6 लाख रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT