Aishwarya Rai-Abhishek Bachchan Divorce Rumors : बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घटस्फोटाच्या अफवांबाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आल्यानं ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. दोघांमध्ये वैवाहीक जीवनात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. यावर अभिषेकने प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, मी अजूनही विवाहीत आहे. तर ऐशर्याने घटस्फोटांच्या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय.
ADVERTISEMENT
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा?
ऐश्वर्या आणि अभिषेक काही दिवसांपासून एकत्रित स्पॉट होत नाहीयत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यातही अभिषेक-ऐश्वर्या एकत्रित दिसले नव्हते. अशातच ऐश्वर्या रायचा तिच्या कुंटुंबियांसोबतचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत ऐश्वर्या रायने तिचा चुलत भाऊ सागर शेट्टीचा बर्थडे सेलिब्रेट केल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, अभिषेक बच्चन या पार्टीत गैरहजर होता.
हे ही वाचा >> Ladki Bahin Scheme : 'लाडकी बहीण'विरोधातील याचिकाकर्त्याने मागितली सुरक्षा, म्हणाला माझ्या जीवाला...
डीएनए इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या रिप्रेजेंटेटिव्हने एक स्टेटमेंट शेअर करत अभिषेक बच्चनने पार्टीत सामील न होण्याचं कारण सांगितलं आहे. अभिषेक त्यांची नानी इंदिरा भादुडी यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भोपाळला गेल्याचं समजते. त्यांच्या नानीची (दादी) प्रकृती ठीक नाही. बच्चन कुटुंब नेहमीच एकमेकांची काळजी घेण्यावर भर देतात. अभिषेकने त्यांच्या नानीच्या तब्येतीची काळजी घेण्याला अधिक महत्त्व दिल्याचं समजते.
हे ही वाचा >> Viral: संध्याकाळ होताच नागीण उगवते सूड! 5 जणांना डसली अन् गावात...| Ajit Pawar Candidate List|
ऐश्वर्या आणि अभिषेकबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 20 एप्रिल 2007 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो खूप व्हायरल झाले आहेत. दोघांना अराध्या नावाची गोंडस मुलगी आहे. अराध्या तिच्या आईसोबत (ऐश्वर्या राय) नेहमीच स्पॉट होत असते. या बर्थडे पार्टीतही तिने हजेरी लावली होती.
ADVERTISEMENT