ADVERTISEMENT
अभिनेत्री मृणाल ठाकूरने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
मृणालचा एक मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे.
आतापर्यंत अनेक बॉलिवूडपटांत भूमिका साकारलेल्या मृणालने अलिकडेच तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबद्दल सांगितलं.
अलिकडेच मृणाल ठाकूरने युट्यूबर रणवीर अहलाबादिया याला मुलाखत दिली.
या मुलाखतीत तिने ब्रेकअपबद्दल सांगितलं.
आतापर्यंत प्रेमात अनेकवेळा धोका मिळाला असल्याचं मृणाल रणवीरशी बोलताना म्हणाली.
यावेळी तिने तिच्या एक्सबॉयफ्रेंडबद्दलही काही गोष्टी शेअर केल्या.
‘७ महिन्यांपूर्वीच माझं ब्रेकअप झालं. माझ्या कामामुळे आणि स्वभावामुळे बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं,’ असं मृणाल म्हणाली.
‘योग्य व्यक्ती भेटण्यासाठी तुम्हाला आधी चुकीच्या लोकांसोबत राहावं लागतं. तुम्हाला नाती पारखावी लागतात.’
‘रिलेशनशिपमध्ये काय चुकीचं आणि काय बरोबर आहे, हे ठरवण्यासाठी तुम्हाला अनुभव हवा असतो.’
‘समजुतदारपणा आणि सहजता नसलेल्या रिलेशनशिपचा मला भाग व्हायचं नाही,’ असं मृणाल म्हणाली.
काही महिन्यांपूर्वी तुटलेल्या रिलेशनशिपबद्दल मृणाल म्हणाली, ‘त्याला वाटत होतं की, मी खूप घाईत असते. त्याला हे जुळवून घेता येत नव्हतं.’
‘तो म्हणाला की तू अभिनेत्री आहेस आणि मी तुझ्यासोबत नाही राहू शकतं,’ असं मृणालने मुलाखतीत बोलताना सांगितलं.
‘तो खूपच मागासलेल्या कुटुंबातून आलेला होता, हे मला कळून गेलं. मी त्याला दोष देत नाही. त्याच्या कुटुंबामुळे असं झालं.’
‘हे रिलेशन तुटल्याचा मला आनंदच आहे. कारण आम्ही जर लग्न केलं असतं, तर आमच्या दोघांच्या वेगवेगळ्या चालीरितीमुळे आमची मुलं गोंधळून गेली असती’, मृणाल म्हणाली.
सिनेसृष्टीत पदार्पण करून मृणाल ठाकूरला अजून दशकही पूर्ण झालेलं नाही.
कमी काळातच तिने बिग बजेट चित्रपटात काम केलं. यात सुपर ३०, बाटला हाऊस, धमाका, तुफान, घोस्ट स्टोरीज, तर काही दिवसांपूर्वी आलेल्या जर्सीमध्ये शाहीद कपूरसोबत ती झळकली.
ADVERTISEMENT