Viral Video: सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका दुसऱ्याच मुलीचा आहे. मात्र एडिटिंग (Editing) करुन त्या व्हिडीओला (Viral Video) रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या व्हिडीओवरुन प्रचंड गदारोळ चालू आहे. एवढचं नाही तर अमिताभ बच्चननेही हा व्हिडीओ शेअर करत अनेकांना आवाहन केले आहे. एडिटिंग विरोधात बोलताना ते म्हणाले की अशा प्रवृतींविरोधात तात्काळ कारवाई केली पाहिजे. तर आता या डिपफेक (Deepfake) व्हिडीओवर स्वतः रश्मिकानेही प्रतिक्रिया देत तिने आपल्या भावना शेअर केल्या आहेत.
ADVERTISEMENT
त्या व्हिडीओमुळे मानसिक धक्का
रश्मिकाचा जो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, तो तिने व्हिडीओ शेअर केला नाही, मात्र त्याच्यावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. रश्मिकाने लिहिले आहे की, हे सर्व शेअर करताना मला प्रचंड वाईट वाटत आहे. कारण एक व्हिडीओ आहे जो डीपफेक आहे, आणि तो प्रचंड व्हायरल होतो आहे. त्या व्हिडीओने मला खूप मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा >>Chhagan Bhujbal : ‘…म्हणून तुमचा तिळपापड झालाय’, मनोज जरांगे भुजबळांना भिडले
धक्कादायक आणि धोकादायक
खरं सांगायचं तर अशा प्रकारच्या घटना या माझ्यासाठी खूप धक्कादायक आणि धोकादायक आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मात्र मी घाबरली आहे. त्यामुळे आता वाटत आहे की, जे माझ्या बाबतीत घडले आहे, ते इतर कोणाच्याही बाबतीत घडता कामा नये. एखाद्या व्यक्तीसाठी ही प्रचंड धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे काही माणसं ही तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग करतात, त्या गोष्टीचेही मला आश्चर्य वाटत आहे.
मी उद्धवस्त झाले असते
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकाने म्हटले आहे की, आज एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून मी माझ्या कुटुंबीयांचे , माझ्या मित्रांचे आणि हितचिंतकांचे आभार मानते. एक प्रकारे त्यांच्यामुळे खरं तर आज सुरक्षित असल्याची जाणीव मला होते आहे. अशा परिस्थितीमध्येसुद्धा ही माणसं माझी सपोर्टिव्ह सिस्टम झाली आहेत. त्यांनीच मला समजून घेत या विचित्र प्रसंगातून त्यांनी मला वाचवले आहे. मात्र हीच घटना जर मी कॉलेजमध्ये असताना घडली असती तर मात्र त्या प्रसंगामुळे मी उद्धवस्त झाले असते असंही तिने सांगितले. त्यावेळी मला खरच कळालं नसतं की, या प्रसंगाला आता कसं सामोरे जायचं. त्यामुळे मला आताही तेच वाटत आहे की, माझ्याबाबतीत जी घटना घडली आहे ती, इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये.
डीपफेक तंत्रज्ञान काय आहे?
डीपफेक हा शब्द डीप लर्निंगमधून आला असून तो एक शिकण्याचाच प्रकार आहे. या शब्दात डीप हा शब्द असल्यामुळे त्या शब्दाला अनेक पदर आहेत. डीप लर्निंग हे कृत्रिम न्यूरल नेटवर्कवर आधारित आहे. या अल्गोरिदममध्ये बनावट साहित्य आणि भरपूर डेटा प्रविष्ट करून त्याचे एका विशिष्ट सामग्रीमध्ये रूपांतरित केली जाते. जी माणसं तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करतात, अशा माणसं बदला घेण्यासाठी डीपफेकचा वापर करतात. एआयच्या मदतीमुळे व्हिडिओ आणि फोटो एडिट करून लोकांना त्रास दिला जातो.
हे ही वाचा >> क्रूरतेचा कळस! गुप्तांगात टाकला एअर पाईप, तरुणाचा तडफडून मृत्यू
व्हिडीओ नेमका कोणाचा ?
व्हायरल होत असलेला रश्मिका मंदान्नाचा हा व्हिडिओ झारा पटेल नावाच्या मुलीचा आहे. जारा ही मूळची भारतीय-ब्रिटिश मुलगी आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४१५ हजार फॉलोअर्स आहेत. जाराने हा व्हिडिओ स्वतःच्या टाइमलाइनवर पोस्ट केला होता, तो एडिट करून रश्मिका मंदान्नाचा चेहरा वापरुन हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT