Shaktiman Movie Shooting : शक्तीमान (Shaktiman) या भूमिकेने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. ज्यांनी ही भूमिका साकारली ते स्टार अभिनेते म्हणजे मुकेश खन्ना (Mukesh Khanna). त्यांनी खूप पूर्वी सांगितले होते की, ते त्यांच्या शक्तीमान या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनवणार आहेत. सोनी पिक्चर्सने काही महिन्यांपूर्वी ‘शक्तिमान’बाबत एक व्हिडीओही शेअर केला होता. (Is it really shooting of Ranveer Singh’s big budget film Shaktiman stopped)
ADVERTISEMENT
यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ताज्या बातमीनुसार, हा बिग बजेट चित्रपट आता होल्डवर आहे असं म्हटलं जात आहे.
‘शक्तिमान’ हा भारतातील पहिला अधिकृत सुपरहिरो मानला जातो. ही व्यक्तिरेखा मुकेश खन्ना यांच्या कल्पनेतील भूमिका होती. 1997 मध्ये ‘शक्तिमान’ नावाचा शो बनवला होता. आठ वर्षे टीव्हीवर तो चाललो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना तो आवडला. यामध्ये मुकेश स्वत: शक्तीमान बनले होते. त्यानंतर जेव्हा त्यावर चित्रपट बनवण्याची चर्चा झाली तेव्हा ते 200 ते 300 कोटींच्या बजेटमध्ये बनणार असल्याचे सांगण्यात आले.
वाचा : Congress : पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये ‘धुसफूस’, केदार म्हणाले, ‘अन्याय झालाय’
काही दिवसांपासून सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत होत्या की, यावर्षी येणारा बिग बजेट चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. लेट्स सिनेमाने आता पुष्टी केली आहे की हा चित्रपट दुसरा तिसरा कुठला नसून मुकेश खन्ना यांचा ‘शक्तिमान’ आहे.
लेट्स सिनेमाच्या ट्विटनुसार, ‘रणवीर सिंग, बेसिल जोसेफ आणि सोनी पिक्चर्सने त्यांचा शक्तीमान प्रोजेक्ट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार चित्रपटाचे बजेट जवळपास 550 कोटींच्या घरात पोहोचले आहे. सध्याच्या बाजारपेठेनुसार इतका पैसा खर्च करणे योग्य नाही.’ असे सोनी पिक्चर्सला वाटते.
‘मात्र, रणवीर सिंगला चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे. पण भविष्यात कधीतरी ही समस्या पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.’
वाचा : Lok Sabha 2024 : भाजपची झोप उडवणारी भविष्यवाणी; थरूरांनी सांगितलं किती जिंकतील जागा?
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र ‘शक्तीमान’ ड्रॉप झाल्यानंतर लोकांकडून दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. शक्तीमान चित्रपट बंद झाल्यामुळे काहीजण दु:खी आहे. तर काही जण म्हणतात की शक्तीमान चित्रपट न बनवला तर बरं आहे.
सोनी पिक्चर्स इंडियाने 2022 मध्ये ही घोषणा केली होती, ते ‘शक्तिमान’ वर चित्रपट बनवणार आहेत. त्याचा टीझरही रिलीज झाला. सोनी हा चित्रपट मुकेश खन्ना यांच्या कंपनी भीष्म इंटरनॅशनलच्या सहकार्याने बनवत असल्याचेही सांगण्यात आले.
वाचा : ‘हा’ मेसेज म्हणजे धोकाच! राम मंदिराच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक
सोनी इंडियाच्या महाव्यवस्थापकांचं शक्तीमान चित्रपटाबाबत मोठं विधान!
ही बातमी व्हायरल होताच सोनी इंडियाचे महाव्यवस्थापक लाडा सिंग यांनी याबाबत खुलासा केला. ज्या पोर्टलने ही बातमी व्हायरल केली त्या पोर्टलबाबत ते म्हणाले की, ‘मीही पत्रकारितेचे काम केले आहे. आणि त्या काळात कोणत्याही बातमीचा ठोस पुरावा किंवा माहिती असल्याशिवाय ती सार्वजनिक करू नये, हे मी शिकलो आहे. ‘शक्तीमान’ होल्डवर गेला नाही. तो चित्रपट तयार होत आहे.’ असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT