Nana Patekar break silence on viral video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शुटींग दरम्यान सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका तरूणाला नाना पाटेकर यांनी चापट मारल्याचे समोर आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर नाना पाटेकर यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या टीकेनंतर आता नाना पाटेकर यांनी स्वत: समोर या येऊन या घटने मागची सत्यता सांगितली आहे. (nana patekar break silence on viral video of him slapping fan on shooting bollywood actor)
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
व्हिडिओत शुटींग सूरू आहे. सर्व कलाकार दिग्दर्शकाच्या कॉलची वाट पाहतायत. इतक्यात सेल्फीसाठी एक मुलगा जवळ येतो आणि नाना पाटेकर त्याच्या डोक्यात जोरात चापट मारतात. त्यानंतर काही तरी पुटपुटतात. शुटिंग दरम्यान घडलेला हा सर्व प्रकार कुणीतरी कॅमेरात रेकॉर्ड केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर केला होता. त्यानंतर नाना पाटेकरांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा : Mohammed Shami: तीन वेळा आत्महत्येचा विचार… संघर्षातून असा घडला मोहम्मद शमी!
नाना पाटेकरांकडून व्हिडिओ जारी
सोशल मीडियावर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर आता नाना पाटेकर यांनी समोर येऊन या घटनेची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सिनेमाची शुटींग सुरु होती. सीनमध्ये एक मुलगा माझ्यामागून येणार होता आणि मी त्याला मारणार होतो, असा सीन आम्हाला शुट करायचा होता. याबाबत आमची एक रिहर्सल ही झाली होती. दिग्दर्शक म्हणाले पुन्हा रिहर्सल करूया.
आम्ही रिहर्सल सुरु करणार तेव्हढ्यात व्हिडिओत दिसणार मुलगा माझ्या मागून आला आणि मी त्याला मारलं. मला नव्हतं माहिती तो कोण आहे. पण जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी आमचा माणूस नव्हता, असे नाना यांनी सांगितले.
दरम्यान मी मागे वळताच व्हिडिओत दिसणारा मुलगा पळून गेला, त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मी कोणाला मारलेलं नाही. चुक झाली असेल तर माफ करा, कोणाचं मन दु:खावलं गेलं असेल तर माफ करा पण गैरसमज करून घेऊ नका, असे देखील नाना पाटेकर यांनी सांगितले. मी चाहत्यांना कधीही फोटोसाठी नाही म्हणत नाही. असंख्य चाहते माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्यासोबत मी असं कधीच वागू शकत नाही, असे देखील नाना पाटेकर व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
हे ही वाचा : क्रूरतेची हद्द! घरात घुसून सामूहिक बलात्कार, अंगावर दिले सिगारेटचे चटके
दिग्दर्शक काय म्हणाले?
या व्हिडिओमागील सत्याबद्दल ‘आजतक’ने चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याशी संपर्क केला. त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “मला नुकतीच ही बातमी कळली आहे. मी आत्ता तोच व्हिडिओ पाहत होतो. नानांनी कुणाला मारहाण केलेली नाही, तर तो माझ्या चित्रपटातील सीन आहे.”
“बनारसच्या मधोमध रस्त्यावर आम्ही त्याचे चित्रीकरण करत होतो. त्यात नाना पाटेकर त्यांच्याजवळ आलेल्या मुलाच्या डोक्यात चापट मारतात. याचं शुटिंग चालू होते आणि नानांनी त्यालाही मारले. मात्र तेथे जमलेल्या लोकांपैकी कुणीतरी ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि त्यानंतर चित्रपटाचा सीन लीक केला. आता सोशल मीडियावर नानांना नकारात्मक आणि असभ्य अभिनेता म्हणून ठरवले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. मी विनंती करतो की चाहत्यांनी या व्हिडिओचे सत्य समजून घ्यावे. हा चित्रपटातील सीन आहे, नानांनी कुणाला मारलेलं नाही”, असं अनिल शर्मा म्हणाले.
नाना पाटेकर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी चांगलेच तापले आहेत. तर आझाद अधिकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ ठाकूर यांनी नाना पाटेकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. आता या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT