Udit Narayan Kiss A Woman Viral Video: बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण एका व्हायरल व्हिडीओमुळे ट्रोल झाले आहेत. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये फॅन गर्लला ओठांवर किस केल्याने उदित नारायण चांगलेच अडचणीत सापडले आहेत. उदित यांचा शो सुरु असताना काही महिला फॅन्सने त्यांचा सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान, उदित नारायण यांनी महिलांना किस केल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. टीप टीप बरसा पाणी गाण्यावर परफॉर्म करताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना किस केलं. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उदित नारायण यांना चांगलंच झापलं आहे.
ADVERTISEMENT
व्हिडीओ व्हायरल होताच उदित नारायण सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले. त्यानंतर उदित नारायण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं, मी बॉलिवूडमध्ये 46 वर्षांपासून काम करत आहे. मी चाहत्यांना जबरदस्ती किस करेन, अशी माझी इमेज नाहीय. चाहत्यांचं प्रेम पाहून मी नमस्कार करतो. फॅन्स खूप दिवाने असतात. पण आम्ही असे लोक नाही आहेत. आम्ही सभ्य लोक आहेत. काही लोक या गोष्टींना वाढवतात. माझ्या व्हिडीओ व्हायरल करण्यामागे काही गुपित कारण असू शकतं. मी स्टेजवरच चाहत्यांपुढे डोकं झुकवतो, कारण आजचा हा क्षण पुन्हा परत येणार नाही. चाहत्यांना वाटतं की आम्हाला मिळण्याची संधी आहे. तेव्हा त्यांनी हात पुढे केला. कुणी हातावर किस केला. ही सर्व दिवानगी असते. याकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे.
हे ही वाचा >> धनंजय मुंडेंवरचा 'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री मुंबई Tak च्या LIVE शोमधून उठून गेले!
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी उदित नारायण यांना ट्रोल करत प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एका यूजरने म्हटलं, AI खतरनाक होत चाललं आहे. दूसऱ्या यूजरने म्हटलं, ही खूप लाजीरवाणं आणि वाईट कृत्य आहे. अन्य एका यूजरने म्हटलं, ह्यांचं जुनं प्रकरणंही आहे. उदित नारायण यांनी हिंदी, तेलुगु, कन्नड, तामिळ, बंगाली, सिंधी, ओडिसा, भोजपुरी, नेपाळी, मल्ल्यालम, असमिया, बघेलीसह अन्य भाषांमध्ये गाणे गायले आहेत. त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांना 2009 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
हे ही वाचा >> नामदेव शास्त्रींना चिंता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची, म्हणाले अगोदर 'त्यांना' मारहाण...
ADVERTISEMENT
