डान्सद्वारे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा तिच्या डान्सच्या मूव्हमुळे कमी वेळातच लोकप्रिय झाली. नुकतंच नोरा फतेहीचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. छोड देंगे असं या गाण्याचं नाव आहे. नोराचं हे गाणं प्रदर्शित होताच ते सोशल मिडीयावर व्हायरल झालं आहे.
ADVERTISEMENT
नोराच्या छोड देंगे या गाण्याचे व्यूज करोडोंच्याही पुढे गेले आहेत. तर प्रदर्शित होताच 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीयो पाहिला होता. या गाण्यातील तिचं लूकही वेगळं असून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. शिवाय यामध्ये तिने उत्तम डान्सही केला आहे.
टी- सीरिजच्या अधिकृत युट्युब अकाऊंटवरून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. नोराचं हे गाणं योगेश दुबे यांनी लिहिलं असून परंपरा टंडनने या गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याची कोरियोग्राफी रजित देव याने केली आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी हा टीझर सोशल मिडीयावर भन्नाट व्हायरल झाला होता.
सत्यमेव जयते सिनेमातील दिलबर या गाण्यामुळे नोरा खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर नोराचा बडा पचताओगे हे गाणंही फार गाजलं. नुकंचच काही दिवसांपूर्वी तिचा गुरु रंधावासोबत अल्बम ‘ नाच मेरी रानी’ लाँच झाला होता. या अल्बमध्येही नोराने अप्रतिम डान्स केला होता. हा अल्बम यूट्यूबवर सुपरहिट ठरला होता.
ADVERTISEMENT