CBI action against Sameer Wankhede updates : एनसीबीचे मुंबईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सीबीआयने त्याच्या घरासह विविध ठिकाणी छापेमारी केली. समीर वानखेडे हे मुंबईतील एनसीबीचे झोनल चीफ होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली. समीर वानखेडे या छापा टाकणाऱ्या पथकाचे नेतृत्व करत होते. पुढे न्यायालयाने या प्रकरणात आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर समीर वानखेडेंचीही बदली झाली. पण, आता समीर वानखेडेंचे खंडणी प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच शाहरुख खानचे एक जुने ट्विट व्हायरल होऊ लागले. ज्यामध्ये शाहरुखने ज्याला तुम्ही पात्र आहात, ते तुम्हाला मिळेल, असे म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT
पठाण चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी शाहरुखने ट्विटरवर #AskSRK म्हणत चाहत्यांशी संवाद साधला होता. युसरा नावाच्या युजरने यावर कमेंट केली होती की, “एक मजेदार आणि मूर्ख विनोद सांगा !!”
हेही वाचा >> Aryan Khan: शाहरुखच्या मुलाला तुरुंगात पाठवणारे समीर वानखेडेच अडकले CBI च्या जाळ्यात
शाहरुख खानला त्याच्या विनोदी उत्तरांसाठीही ओळखलं जातं. पण याला उत्तर देताना मात्र तो गंभीर झाला होता. शाहरुख खानने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “कर्मा नावाचे एक नवीन रेस्टॉरंट आहे. तिथे कोणताही मेनू नाही. तुम्ही ज्याला पात्र आहात ते तुम्हाला मिळेल.”
समीर वानखेडेंवर गुन्हा, ट्विट का झालं व्हायरल?
आता समीर वानखेडेंवर सीबीआयने गुन्हा दाखल केला. वानखेडेंवर कायदेशीर कारवाई झाल्यानंतर शाहरुखच्या या तीन महिन्यांपूर्वीच्या ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. मात्र, या ट्विटमुळे समीर वानखेडे प्रकरणावर शाहरुखची ही प्रतिक्रिया असल्याची दिशाभूलही काही लोकांची होत आहे.
आर्यन खानला 28 दिवस राहावे लागले होते तुरुंगात
2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने छापा टाकला होता. येथून आर्यन खानसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्या लोकांवर NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा >> आर्यन खानवर कारवाई ते क्लिनचीट, नवाब मलिकांची अटक; समीर वानखेडेंची बदली काय घडलं ८ महिन्यात?
या प्रकरणात आर्यन खानला 28 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. 27 मे 2022 रोजी एनसीबीने आरोपपत्रातून आर्यन खानचे नाव काढून टाकले. त्याच सुमारास समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधून बदली करण्यात आली. त्यांना चेन्नईत डायरेक्टरेट जनरल टॅक्सपेअर सर्व्हिसेस म्हणून पाठवण्यात आले होते.
आर्यन खान निर्दोष सुटल्यानंतर आता काय करतोय?
या सर्व अडचणींना तोंड दिल्यानंतर आर्यन खान आता आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच, त्याने Dyavol X नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला.
आर्यनने शाहरुख खानसोबत या ब्रँडची जाहिरातही दिग्दर्शित केली होती. हे त्याचं दिग्दर्शनातील पदार्पण मानलं जात होतं. सध्या तो स्टारडम नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे.
हेही वाचा >> Nawab Malik: 70 हजाराचा शर्ट, 2 लाखांचे बूट.. सगळं आलं कुठून?, मलिकांचे समीर वानखेडेंवर नवे गंभीर आरोप
चित्रपटसृष्टीवर आधारित ही मालिका आर्यनने स्वत: लिहिली असून त्याचे दिग्दर्शनही करणार आहे. याची निर्मिती शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट करत आहे.
ADVERTISEMENT