Bollywood : बॉलिवूड चित्रपट जगताशी संबंधित छोट्या-मोठ्या बातम्या समोर येतच असतात. सध्या कोट्यवधी रुपयांचे बजेट असलेला आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रामायणातील पौराणिक पात्रांचे लूक आणि त्यांच्या संवादांवरून सर्वात मोठा वाद सुरू आहे. या चित्रपटाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक ठिकाणाहून निषेधाचे आवाज उठले जात आहेत. (Shahrukh’s raone movie is better than adipurush fans comments goes viral)
ADVERTISEMENT
शाहरूख खानचा ‘हा’ चित्रपट आदिपुरूषपेक्षा चांगला, चाहत्यांच्या प्रतिक्रिया!
‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यापासून लोक शाहरुख खानच्या ‘रावन’ चित्रपटाचं कौतुक करू लागले आहेत. सोशल मीडियावर लोक ‘रावन’चे वेगवेगळे सीन शेअर करत आहेत आणि त्याला ‘आदिपुरुष’पेक्षा हजार पटीने चांगलं म्हणत आहेत.
Pune MPSC: दर्शना पवारची राहुलने केली दगडाने ठेचून हत्या?, धक्कादायक माहिती समोर
‘आदिपुरुष’ची सातव्या दिवशी 5 कोटींची कमाई!
प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दररोज त्यांच्या कमाईत मोठी घट होत आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये केवळ 5.5 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने एकूण 410 कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाबद्दल आक्षेप घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यातील कहाणी आणि पात्र आहेत. आपल्याला माहित आहे की महाकाव्य रामायण सामान्य लोकांशी जोडलेले आहे. भारतभर आपण मोठ्या श्रद्धेने पाहतो. कदाचित त्यामुळेच निर्मात्यांनी हा चित्रपट एवढ्या मोठ्या बजेटमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला असेल. प्रभाससारख्या सुपरस्टारला मुख्य नायक म्हणून घेतले. चित्रपटाचे बजेटही 500 ते 600 कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून याचे वर्णन केले जात आहे.
Monsoon: मुंबईकर चिंब भिजले… पावसाच्या जोरदार सरी, कोकणातही मुसळधार पाऊस!
या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप होत्या. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकही ते पाहण्यासाठी उत्सुक होते. पण चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरून तो फार कोणाला आवडलेला नाही हे दिसतं. रामानंद सागर यांचे रामायण आपण सर्वांनी पाहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा दूरदर्शनवर पुन्हा रामायण दाखवले गेले तेव्हा लोकांच्या आठवणी ताज्या झाल्या. अशा परिस्थितीत जेव्हा हा चित्रपट आला आणि त्यातील संवाद लोकांनी ऐकले तेव्हा अनेकांच्या मनात निराशेची भावना निर्माण झाली.
ADVERTISEMENT