Viral Fashion Video: सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी तरुण मुलं काय करतील, याचा नेम राहिला नाही. बोल्ड आऊटफिट घालून इन्स्टाग्रामवर रिल बनवण्याऱ्यांनीही इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. स्टयालिश आयकॉन उर्फी जावेदचा कुणी नादच करू शकत नाही, असं ज्यांना वाटत असेल, त्यांच्यासाठी एका पोराचा भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
तोकडे कपडे घालून फॅशनच्या दुनियेत प्रकाशझोतात आलेली उर्फी तिच्या चाहत्यांसाठी गळ्यातील ताईतच बनली आहे. पण दुसरीकडे एका पोरानं थेट उर्फीलाच टक्कर दिली आहे. या पोरानं उर्फीसारखे आगळेवगळे ड्रेस घालून व्हिडीओ बनवला आहे. या पोराचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
उर्फी जावेदला टक्कर देणाऱ्या पोराचा व्हिडीओ पाहिलात का?
रवी सागर नावाच्या या मुलानं हद्दच केली आहे. कारण या मुलाने सुतळीचे पोतं कापून एक मिनी ड्रेस बनवला. त्यानंतर हा ड्रेस परिधान करून त्या मुलाने व्हिडीओ बनवला. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, या मुलानं तोकडे कपडे घालून उर्फीसारखे पोज देण्याचा प्रयत्न केलाय. इतकच नव्हे तर त्याने संतूर साबणाने एक भन्नाट आऊटफीट बनवल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. तसच एका प्लास्टिकच्या रस्सीची खाट डोक्यावर घेऊन या मुलाने चाहत्यांचं मनोरंजन केल्याचं पाहायला मिळत आहे.
तोकडे कपडे घातल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
पोराचं बोल्ड कपड्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगेवगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिलं, ग्रेट भाई..दुसरा यूजर म्हणाला, तू उर्फीला हरवलं. अन्य एका यूजरने म्हटलं, भावाच्या पुढं उर्फीची फॅशन फेल. तसच आणखी एका यूजरने म्हटलं, उर्फीच्या पोटावर लात का मारत आहेस? काय भन्नाट टॅलेंट आहे, असंही एकाने प्रतिक्रिया देत म्हटलंय.
@ravisagar88 नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 30 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
ADVERTISEMENT