Saif Ali Khan Attacked Latest Update: अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अजूनही पोलिसांनी पकडला नाही. सैफच्या घरात घुसलेल्या हल्लेखोराची सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटली आहे. चोरटा घरातील पायऱ्यांवरून खाली उतरत असताना कॅमेरात कैद झालाय. मुंबई पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी एकूण 20 टीम बनवल्या आहेत. प्रत्येक टीमला वेगवेगळा टास्क दिला आहे.
ADVERTISEMENT
आरोपी पकडण्यासाठी बनवल्या 20 टीम
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 20 टीम बनवल्या आहेत. पोलिस त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज झाले आहेत. तपास पथक टेक्निकल सपोर्टही घेत आहे. आरोपीची मागील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? हे ही तपासलं जात आहे.
हे ही वाचा >> Mumbai Weather Update : आरारारा! मुंबईचं हवामान बिघडलं? कशी आहे आजच्या तापमानाची स्थिती? जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहे. यामध्ये चोर सैफवर हल्ला केल्यानंतर लाकडाची काठी आणि लांब हेक्सा ब्लेडला घेऊन पळून जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली उतरताना आरोपी कॅमेरात कैद झालाय.
हे ही वाचा >> 17 January 2025 Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल! काही लोकांना मिळेल पैसाच पैसा
करिना कपूरची सोशल मीडियावरील पोस्ट होतेय व्हायरल
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर करिना कपूरच्या काल मध्यरात्री सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. आमच्या कुटुंबासाठी खूप आव्हानात्मक दिवस राहिला. आम्ही अजूनही काही गोष्टी पडताळण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सर्व कसं घडलं, याचा विचार करत आहोत. या कठीण काळात मीडिया आणि पापाराजींना विनंती करत आहे की,कोणत्याही अफवा पसरवू नका. जे सत्य नसेल, तसं काही कव्हरेज करू नका. तुम्ही घेत असलेली काळजी आणि चिंता आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, आमच्या सेफ्टीसाठी तुम्ही सर्व चिंता व्यक्त करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे, असं करिना कपूरने सोशल मीडियावर म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
