झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे. म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय.
ADVERTISEMENT
नुकतंच या मालिकेत कॉलेजचा नवीन डीन विक्रांत म्हणजेच अभिनेता सागर कारंडे याची एन्ट्री झाली आहे. विक्रांतमुळे मालिकेला नवीन वळण येणार यात शंकाच नाही. पण सागर कारंडेच्या एन्ट्रीमुळे ऑफस्क्रीन होणाऱ्या धमाल मजा मस्ती मध्ये अजून वाढ झाली आहे. नुकतंच श्वेताने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात सागर आणि श्वेता शूटिंग सुरु करण्यापूर्वी सांगाड्याचे आशीर्वाद घेत आहेत. नुसतं मालिकेतूनच नाही तर हे कलाकार प्रत्येक माध्यमातून प्रेक्षक आणि चाहत्यांचा मनोरंजन करत असतात असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. हा फोटो पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हास्याची लहर उठली आहे. ऑफस्क्रीन चालू असलेल्या धमाल मस्तीमध्ये शेअर केलेल्या या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
ADVERTISEMENT