Today Gold Rate: देशभरात एक आठवड्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झालीय. लग्नसराईच्या हंगामात सोनं खरेदी करण्याचा तुमचा प्लॅन असेल, तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या भावात 10,900 रुपयांची घसरण झालीय. अशातच सोनं-चांदीच्या आजच्या दराबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. आज सोन्याच्या 18 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅमचे दर 8200 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत 590300 झाली आहे. तर सोन्याच्या 18 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 820 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे सोन्याची किंमत 59030 झालीय.
ADVERTISEMENT
22 कॅरेट सोन्याचा भाव काय?
आज 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांनी घसरण झालीय. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमची किंमत 10000 रुपयांनी वधारली आहे. 24 कॅरेटचे प्रति 100 ग्रॅम सोनं आज 1090 रुपयांनी स्वस्त झालंय. त्यामुळे याची किंमत आज 78700 रुपयांवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेटचं प्रति 100 ग्रॅम सोनं 10900 रुपयांनी स्वस्त झालं असून 7,87,000 रुपयांवर पोहोचलं आहे.
हे ही वाचा >> Raj Thackeray MNS : "भाजप सोबत जाणं ही चूक", मनसेच्या बैठकीत उमेदवारांकडून नाराजी - सूत्र
आज 25 नोव्हेंबर चांदीचे भाव
आज संपूर्ण देशात चांदी स्वस्त झालीय. अशातच 10 ग्रॅम चांदी पाच रुपयांनी स्वस्त झाली असून 915 रुपयांवर पोहोचली आहे. तर 100 ग्रॅम चांदीचे दर 50 रुपयांनी कमी झाले असून 9150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 1 किलोग्रॅम चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली असून याची किंमत 91500 रुपये झाली आहे. मागील काही दिवसांपासून चांदीच्या दरात बदल झाले नव्हते. परंतु, आज चांदी स्वस्त झाली आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 LIVE: नव्या आमदारांचा शपथविधी 'या' दिवशी होणार?
आज मुंबईत सोन्याचा भाव
मुंबईत सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7200 रुपये झाला आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7215 रुपये झाला आहे.
बंगळुरुत सोन्याच भाव
आज बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7200 रुपये झाला आहे.
पटन्यात सोन्याचा भाव
आज पटन्यात सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7205 रुपये झाला आहे.
जयपूरमध्ये सोन्याचा भाव
जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7215 रुपये झाला आहे.
ADVERTISEMENT