Ladki Bahin Yojana: महिलांसाठी खुशखबर! 'या' दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचे 1500?

मुंबई तक

24 Nov 2024 (अपडेटेड: 24 Nov 2024, 08:07 PM)

Ladki Bahin Yojana 6th Installment: महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना सुरु केल्या जातात. तसच राज्य सरकारांकडूनही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.

ladki bahin yojana scheme when will women get 1500 rupees maharashtra assembly election 2024 aditi tatkare mukhymantri ladki bahin yojana scheme

महिलांना पुढचा हप्ता कधी मिळणार?

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

लाडक्या बहिणींच्या खात्यात किती रुपये जमा होणार?

point

लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana 6th Installment: महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना सुरु केल्या जातात. तसच राज्य सरकारांकडूनही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यावर्षी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केलीय. योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हफ्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता कधी मिळणार आणि किती रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केलीय. सरकारकडून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. दिवाळीच्या उत्सवात राज्य सरकारने नोव्हेंबरचा हफ्ता आधीच अॅडवान्समध्ये दिला होता. ज्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचे 3 हजार रूपये एकत्रित जमा करण्यात आले. आता महिलांना सहाव्या हफ्त्याच्या पैशांची प्रतीक्षा आहे.

हे ही वाचा >> IPL 2025 Mega Auction LIVE : 'हा' खेळाडू ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! लिस्ट पाहा

'या' दिवशी जमा होणार पैसे?

राज्यात काल शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता सरकार स्थापन झाल्यावर जारी केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यावेळी महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. कारण मागच्या वेळी महिलांना एकत्रित 3000 रुपयांची रक्कम देण्यात आली होती. 

हे ही वाचा >> Optical Illusion Test: 'आज'च्या गर्दीत हरवलाय 'राज'; हिंमत असेल तर 9 सेकंदात शोधून दाखवा

माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या या लिंकवर https://testmmmlby.mahaitgov.in/ जावं लागेल. इथे तुम्हाला लाभार्थ्यांचं स्टेटस पाहण्याचं ऑप्शन मिळेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर असे दोन ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून मोबाईल ओटीपीवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्ही स्टेटस पाहू शकता. 

    follow whatsapp