Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशच्या बरेलीत एक धक्कादायक घटना घडलीय. मोबाईलवर जीपीएस सिस्टमच्या मदतीने कार चालवणं तिन मित्रांच्या जीवावर बेतलं. रामगंगा पुलावरून एक कार खाली कोसळून 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. हा भयानक अपघात जीपीएस सिस्टममुळे झाल्याचा दावा मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे. परंतु, फरीदपूर पोलिसांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय. लग्नसोहळ्यासाठी जाणाऱ्या तीन मित्रांना या अपघातात जीव गमवावा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
...अचानक पूल संपला आणि कार खाली कोसळली
पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, रामगंगा पुलाजवळ हा अपघात झाला आहे. कार पुलावरून कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच फरीदपूर आणि दातागंज बदायूंचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना तीन जणांचे मृतदेह घटनास्थळी आढळले. पूलाचं बांधकाम अर्धवट झाल्याने कार नदीत कोसळली, अशी प्राथमिक माहिती आहे.
हे ही वाचा >> IPL 2025 Mega Auction LIVE : 'हा' खेळाडू ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! लिस्ट पाहा
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सर्व लोक जीपीएसच्या मदतीने रस्त्यावरून प्रवास करत होते आणि अचानक पूल संपल्याने त्यांचा अपघात झाला. संबंधीत विभागाने सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा सूचना बोर्ड लावला नाही. ज्यामुळे हा अपघात घडला, असा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.
हे ही वाचा>>Ladki Bahin Yojana: महिलांसाठी खुशखबर! 'या' दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचे 1500?
ADVERTISEMENT