Sexual Relationship 3 tips: मुंबई: प्रत्येक व्यक्तीसाठी लैंगिक संबंध ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ज्याकडे तुम्ही अनेकदा अनेकजण दुर्लक्ष करतात. आपल्या सोबतच आपला जोडीदार देखील लैंगिक आयुष्यात समधानी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा विचार करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. (3 tips by which you can satisfy your female partner)
ADVERTISEMENT
पुरुषाप्रमाणेच स्त्री देखील लैंगिक संबंधानंतर समाधानी असणं अत्यंत आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या महिला पार्टनरला नक्कीच संतुष्ट करू शकता.
हे ही वाचा>> Honeymoon Tips: हनिमूनच्या पहिल्या रात्री लैंगिक संबंध ठेवायलाच हवे?
1. तिला काय आवडते याबद्दल तिच्याशी बोला
संभाषणामुळे तुमचे लैंगिक जीवन आणखी चांगले होऊ शकते. झोपण्यापूर्वी आणि लैंगिक संबंधादरम्यान, तुमच्या जोडीदाराच्या इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या आवडत्या गोष्टीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लैंगिक संबंधादरम्यान तिला काय आवडते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिची प्रचंड काळजी घ्या. तसेच संबंधावेळी ती आनंद घेत आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
2. तिचं कौतुक करा...
तुमच्या जोडीदाराचे शरीर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिला कुठे स्पर्श करायला आवडते ते समजून घ्या. चुंबन हा अत्यंत संवेदनशील प्रकार आहे. त्यामुळे तुमच्या पार्टनरला ज्या पद्धतीने आवडत असं तसं चुंबन घ्या. त्यामुळे तुमची पार्टनर नक्कीच आनंदी होईल.
हे ही वाचा>> बेडरुममध्ये पार्टनरला असं करा संतुष्ट, तिसरी Tips जर विसरलात तर समजा तुम्ही...
3. बेडरूममध्ये थोडी फॅन्टसी आणा
लैंगिक संबंधादरम्यान हे आवश्यक नाही की संभोग हे फक्त तुमचे काम आहे. आपल्या फॅन्टनसीवर जोर द्या. असे काही आहे का जे तुम्ही प्रत्यक्षात करू शकत नाही, परंतु त्यातील फॅटन्सी तुम्हाला नक्की आवडते. असं असेल तर तुमचया पार्टनरसोबत नक्की बोला, एका फॅन्टसीचा विचार करा. त्यानुसार तुम्ही कल्पना करा. कदाचित तुमच्या जोडीदाराला तुमचं हे असं वागणं नक्कीच आवडेल आणि तुम्ही तिला अधिक संतुष्ट करू शकाल.
ADVERTISEMENT