Anand Mahindra : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत सध्या प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. देशातील अनेक कंपन्यांकडून तंत्रज्ञानाच्या (Technology) जोरावर वेगवेगळ्या गोष्टी बनवून लोकांना अनेकांनी आश्चर्यचकीत केले आहे. आजपर्यंत डिजिटल वॉचपासून (Digital Watch) असंख्य गोष्टी बाजारात आल्या आहेत. त्यामुळे लोकांची लाईफस्टाईल (Life style) अगदी सोपी झाली आहे. एवढंच नाही तर कार, बाईक आणि सायकलमध्येही अनेक बदल करुन सायकलही अधिकाधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी हा नवा आविष्कार सादर करुन आम्हाला मोठा आनंद दिला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.(anand mahindra viral post worlds first foldable bicycle praise iit student innovation ride on dimond frame bike)
ADVERTISEMENT
बाईकची भूरळ
नुकताच काही दिवसांपूर्वी आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनीही एक वेगळा अनोखा शोध लावला आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेम बाईक तयार केली आहे. ही बाईक बघून अनेकांना त्याची भूरळ पडणार आहे. कारण स्वतः महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनाही विद्यार्थ्यांनी बनवलेल्या त्या बाईकची भूरळ पडली आहे.
हे ही वाचा >> दारुसाठी पैसे मागितले, नकार देताच केली शरीराची चाळण
आनंद महिंद्रा प्रेमात
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांची ही संकल्पना त्यांना इतकी आवडली आहे की, त्यांनी ई बाईकची स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत (X) अकाऊंटवरून त्याची माहिती आणि त्याचे फोटो शेअर केले आहेत. आनंद महिंद्रा यांची ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
जगातील पहिली फोल्डेबल ई-बाईक
आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, आयआयटी बॉम्बेमधील काही लोकांमुळे आम्हाला पुन्हा अभिमान वाटू लागला आहे. कारण त्यांनी फुल्ल साईज व्हिल्सची जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-बाईक तयार केली आहे. ही बाईक इतर फोल्डेबल बाइक्सच्या तुलनेत ती केवळ 35 टक्के अधिक कार्यक्षम बनवण्यात आली आहे. या बाईकला ते अगदी कोणताही वेग असला तरी ती अगदी सहज थांबवता येऊ शकणार आहे.
या ठिकाणी मिळणार बाईक
त्याचबरोबर ही एक अशा एकमेव बाईक आहे जी वळल्यानंतरही तिला उचलावी लागत नाही. त्यामुळे या सायकलचा वापर कोणत्याही कार्यालयाच्या परिसरात फिरण्यासाठी होणार असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले आहे. त्यामुळे मी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. हॉर्नबॅक ई-कॉमर्स वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरही ती उपलब्ध असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा >> श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, ट्रॉली बॅगमध्ये सापडले शरीराचे तुकडे
अनेक जण आहेत ‘उत्सुक’
आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट 21 ऑक्टोबर रोजी शेअर केली होती, मात्र आजपर्यंत या पोस्टला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला एकाने कमेंटे केली आहे की, हे सगळंच आश्चर्यकारक आहे. त्यामुळे ही बाईक खरेदी करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंट केली आहे की, या बाईकची किंमत तरी काय असू शकेल. मात्र लोकांच्या माहितीसाठी म्हणून या बाईकची किंमत 45 हजार रुपये असल्याचे सांगितले असून ही बाईक तुम्हाला घ्यायला आवडेल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT