Maharashtra,annapurna scheme in marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना लागू करण्यात आली आहे. राज्यातील पात्र कुटुंबांना वर्षातील तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याबद्दलचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. या योजनेचे निकष काय आहेत, कोणाला योजनेचे पैसे मिळणार, याबद्दल जाणून घ्या. (what is annapurna yojana maharashtra)
ADVERTISEMENT
केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना आता वर्षाला तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे निकषही निश्चित करण्यात आले असून, बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
अन्नपूर्णा योजना पात्रता काय?
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
- सद्यःस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत पात्र असलेले सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
हेही वाचा >> पहिला हफ्ता तीन हजारांचा, 'या' तारखेला खात्यात होणार जमा
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
- एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल.
- योजनेचा लाभ फक्त १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे.
अन्नपूर्णा योजना अर्ज करण्यातून सुटका
केंद्राच्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या दोन्ही योजनांमध्ये समावेश नसलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही.
कुणाला किती पैसे मिळणार?
- उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यामार्फत केले जाते. मु्ख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत ३ मोफत गॅस सिलेंडरचे वाटपही तेल कंपन्यामार्फत केले जाईल.
हेही वाचा >> अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू!
- उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य सरकार ५३० रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर ८३० रुपये किंवा जिल्ह्यानिहाय सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जाणार आहेत.
ADVERTISEMENT