Ashadhi Ekadashi 2024 Date And Time : पंढरीच्या लाडक्या विठूरायाची आस वारकऱ्यांना लागली असून ते विठ्ठल दर्शनासाठी आतूर झाले आहे. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi 2024) येऊन ठेपली आहे. त्यामुळे भक्तांना विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.त्यामुळे आषाढी एकादशी नेमकी कधी आहे? आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे? हे जाणून घेऊयात. (ashadhi ekadashi 2024 know puja vidhi muhurt importance date and time pandharpur wari)
ADVERTISEMENT
आषाढी एकादशीचा तिथी
यंदा आषाढी एकादशी येत्या 17 जुलै 2024 ला साजरी होणार आहे. हिंदू पंचागानुसार आषाढी एकादशीचा तिथी 16 जुलै रोजी रात्री 08:33 वाजता सुरू होणार आहे. आणि 17 जुलै रोजी रात्री 09:02 वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आषाढी एकादशी 17 जुलैला साजरी होणार आहे.
या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. उपवास केला जातो. आषाढी एकादशीची तिथी हिंदू धर्मांमध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विठ्ठल भक्त विठूरायाच्या चरणी लीन होतात.
हे ही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा तिसऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राचा 'खेळ'? Inside Story
एकादशीचा शुभ मुहूर्त काय?
आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त हा पहाटे 5 वाजल्यापासून ते सांयकाळी 4 वाजू 33 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही विठूरायाची आणि भगवान विष्णूची पूजा करू शकता.
आषाढी एकादशीनिमित्त अनेक भक्त पारायण करतात. हे पारायण करण्यासाठी शुभ मुहूर्त हा पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सूरू होणार आहे. आणि तो 8 वाजून 20 मिनिटांनी समाप्त होईल. पारायणाच्या दिवशी द्वादशी 8 वाजून 44 मिनिटांनी समाप्त होईल.
एकादशीचा पूजा विधी
देवशयनी एकादशीचा उपवास करणाऱ्या भक्तांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. नंतर पूजेचे ठिकाण स्वच्छ करून तेथे भगवान विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर भगवान विष्णूला पिवळे वस्त्र, पिवळे फूल आणि पिवळे चंदन अर्पण करा. त्यानंतर त्यांना पान आणि सुपारी अर्पण करा आणि त्यांना धूप, दिवे आणि फुले अर्पण करा.
हे ही वाचा : Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले
यानंतर मग या मंत्राने भगवान विष्णूची स्तुती करा... ‘सुप्ते त्वय जगन्नाथा जमत्सुप्तम भवेदिदम्।'' जेव्हा तुम्ही आत्मज्ञानी असता, तेव्हा सर्व चालणारे आणि न फिरणारे जग ज्ञानी होतात. अशा प्रकारे भगवान विष्णूची विधीवत पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. मग स्वतःचे अन्न किंवा फळ खावे.
ADVERTISEMENT